काॅर्न सँन्डविच रोल

Published by Mohsina Mukadam on   January 24, 2018 in   2018Food Corner

काॅर्न सँन्डविच रोल बनविण्यासाठी-

साहित्य:

 • ८ ब्रेड स्लाईस
 • १/२ कप मका
 • १/४ कप क्रीम चीज
 • १ किंवा २ हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर
 • बटर

कृती:

 1. ब्रेडच्या कडा कापून लाटण्याने ब्रेड स्लाईस लाटून घ्या
 2. त्याच्या एका बाजूला थोडेसे बटर लावा.
 3. मक्याचे दाणे वाफवून घेऊन खडबडीत वाटून घ्या.
 4. बारीक चिरलेली हिरवी मिरची,कोथिंबीर, मका, क्रीम चीज सर्व एकजीव करा.
 5. ब्रेडच्या बटर न लावलेल्या भागावर हे मिश्रण पसरा व रोल करा.
 6. टोस्टरमध्ये हे रोल टोस्ट/ग्रील करून घ्या.
 7. वरुन बटर लावून साॅस किंवा चटणीसोबत खायला द्या.

 – मोहसिना मुकादम | पाककृती – कालनिर्णय जानेवारी २०१८