बटाटयाची शेव

साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग.

कृती :

  • बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
  • कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या.
  • चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा.
  • शेवपात्रातून शेव पाडा. तळा.

टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.