श्रावण | shravan 2023 hindu calendar | spiritual significance of shravan month | about sawan month

श्रावणातले सात्विक नियोजन | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Sattvic Planning in Shravana | Prachi Rege, Dietitian

श्रावणातले सात्विक नियोजन श्रावणाच्या या महिन्यात अनेक सणवार, उत्सव असतात व उपवासही. पावसाळ्याचा हा काळ आरोग्य आणि आहार या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा असतो.म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरांचे पालन करतानाच आहाराचे नियम विसरून चालणार नाही. आपल्या खानपानाच्या परंपरा/संस्कृतीला कायम शास्त्रीय आधार राहिलेला आहे. या पवित्र महिन्यात अनेक जण विविध व्रतवैकल्ये करत असतात. त्यामुळेच या दिवसांत […]

कृष्ण | Dahi Handi | Dahi Handi Utsav | Gokulashtami | Mathura

श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

  श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) : मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘कला’ म्हणतात.) कृष्ण ला दही-दूध […]

श्रीकृष्ण | Gopalkala Festival | Janmashtami 2019 | Krishna Janmashtami | Janmashtami Article

श्रीकृष्णजयंती – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)

  श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण अष्टमी : १. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या […]

ढोकळा | वैशाली जोशी | कालनिर्णय स्वादिष्ट | ऑगस्ट २०१९ | Dhokla ki recipe | Dhokla ki recipe in marathi

उपवासाचा तिरंगी ढोकळा – वैशाली जोशी

उपवासाचा तिरंगी ढोकळा साहित्यः- २ वाट्या वरीचे तांदूळ, १ वाटी साबुदाणा, १/२ वाटी राजगिऱ्याच्या लाह्या, १ १/२ वाटी आंबट ताक, हिरवा व केशरी खाण्याचा रंग, आले-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बेकिंग सोडा, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी १ चमचा साजूक तूप, वरून सजविण्यासाठी ओले खोबरे. कृतीः- वरीचे तांदूळ व साबुदाणा चार ते पाच तास पाण्यामध्ये […]

श्रावण | Shravan | Shravan Month | Shravan 2020

श्रावण महिना – श्रावणमास

ह्या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून ह्याला ‘श्रावण’ ह्या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्यांच्या दृष्टीने चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. ह्याचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत-वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. […]

वरदलक्ष्मी व्रत

श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे  मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी, […]

दुसरा श्रावणी सोमवार | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर - श्रावणमास २०१७

दुसरा श्रावणी सोमवार

श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हिमाचल प्रदेशातील  चंबा प्रांतात एक जत्रा भरते. ती पुढे बरेच दिवस चालू असते. ह्यावेळी गोडधोड खाण्याचे. जेवणाचे आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शेवटच्या दिवशी सगळी मंडळी मिरवणूक काढून नदीवर जाऊन मंत्रोच्चारांसह वरूण देवतेसाठी त्या नदीच्या पात्रात वाहत्या प्रवाहामध्ये मक्याच्या कणसाचे केस आणि नारळ सोडतात. मग सर्वजण परस्परांना अत्तर लावून मिठाई वाटतात. […]

श्रावणी शनिवार

१) अश्र्वत्थ-मारुती पूजन: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. […]

बटाटयाची शेव

साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा. शेवपात्रातून शेव पाडा. तळा. टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.

रव्याची खीर

रव्याची खीर

साहित्य : बारीक रवा पाव वाटी, तूप १ चमचा, दूध २ वाटया पाणी अर्धी वाटी साखर ४ चमचे स्वादाकरता जायफळ-वेलची पूड केशर सुका मेवा मीठ कृती :  तुपात रवा मंद आचेवर भाजा. थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या. त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला. यानंतर दूध […]