उपवासाची बटाट्याची बर्फी

 

साहित्यः


  • १ कप उकडलेल्या बटाटयाचा लगदा
  • अर्धा कप नारळाचे खोबरे
  • अर्धा कप दूध
  • २ कप साखर
  • ७/८ वेलदोडे
  • अर्धा चमचा सायट्रिक ॲसीड (लिंबाचे फूल)
  • थोडेसे जायफळ
  • थोडी जायपत्री
  • अर्धी वाटी पिठीसाखर

कृती:


  1. पिठीसाखरेखेरीज सर्व पदार्थ एकत्र करून गॅसवर ठेवावे.
  2. नंतर जरा घट्टसर झाले की वालाएवढे मिश्रण एका वाटीत पाणी घेऊन त्यात घालून पहावे.
  3. विरघळले नाही म्हणजे उतरावे व डावेने घोटावे.
  4. जरा वेळ घोटल्यानंतर मग त्यात पिठीसाखर घालून पुन्हा घोटावे व ओलसर आहे तोच तूप लावलेल्या ट्रे किंवा थाळीत मिश्रण ओतून हाताला तूप लावून थापावे.
  5. वरील प्रमाणाच्या बर्फीसारख्या जाड २४ वडया होतात व अगदी खाण्याच्या बर्फीप्रमाणे बर्फी चवीला सुंदर लागते.
  6. जायफळ व जायपत्रीचा वास फार सुंदर येतो.
  7. त्यामुळे बटाटयाचा उग्रपणा कमी होतो.
  8. नंतर वडया कापून प्रत्येक वडीच्या मध्यभागी एकेक चारोळी बसवावी.

ही बर्फी उपवासाला चालते.


– सौ. मंगला बर्वे | कालनिर्णय ऑगस्ट १९७५

 

 

 

One comment

  1. Ashwini Satish Pidadi

    Innovative recipe…
    I like …

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.