September 11, 2024

इटालियन सलाद

  • इटालियन सलाद बनवण्यासाठी लागणारे- 

  • साहित्य:

  1. 4-5 टोमॉटो (लालबुंद कडक)

  2. 1 कांदा

  3. 1 काकडी

  4. 1(लहान) सिमला मिरची

  5. 1/2 कप (लहान तुकडे) मोझरेला चीज

  6. 1/2 कप बेसिलची पाने

  7. 8टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल

  8. 4 टेबलस्पून व्हिने

  9. 1 कडक पाव (बुन पाव)

  10. मीठ

  11. चवीनुसार काळी मिरपूड

  12. 1 टेबलस्पून ऑरेगॅनो

  13. 1 टेबलस्पून चिलीफ्लेक्स.

  • कृती:

  1. कडक पावाचे उभे जाडसर तुकडे करा व त्यावर थोडेसे लोणी परतवा. नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा व त्यावर ऑरेगॅनो व चिलीफ्लेक्स भुरभुरवा. मायक्रोव्हेवमध्ये एक मिनिट हाय वर टोस्ट करा. तेल, व्हिने, मीठ व काळी मिरपूड एकत्र करून ड्रेसिं बनवा.

  2. टोमॉटोचे दोन तुकडे करून त्यातील बिया, रस काढून टाका व त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. कांद्याचे उभे पातळ स्लाइस करा. काकडीची साले काढून तुकडे करा. सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करा. त्यात सलाद ड्रेसिं घालून टॉस करा व एक तास फ्रिजमध्ये ठेवा.

  3. सर्व्ह करताना त्यात ब्रेडचे तुकडे घाला व हलक्या हाताने एकत्र करा. ब्रेडच्या तुकडय़ांना ड्रेसिं व रस नीट लागले पाहिजेत. सजावटीसाठी मोझरेला चीजचे तुकडे व बेसिलची पाने घाला. कडक पाव नसल्यास साध्या पावाचे टोस्ट करून घालू शकता. पण कडक पावाने सलाद खुमासदार होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.