कलिंगडाच्या सालीची चेरी | शर्वरी व्यवहारे, अहमदनगर | Watermelon Rind Cherry | Sharvari Vyavahare

Published by शर्वरी व्यवहारे, अहमदनगर on   April 26, 2021 in   2021Recipes

कलिंगडाच्या सालीची चेरी

साहित्य : १ कप साखर, लाल-पिवळा-हिरवा-केशरी खाण्याचा रंग, व्हॅनिला इसेन्स, आवश्यकतेनुसार कलिंगडाच्या साली व पाणी.

कृती : कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग काढा. राहिलेल्या पांढऱ्या भागाचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. एका भांड्यात पाणी घालून तयार तुकडे दहा मिनिटे उकळवून घ्या. उकळवलेले पाणी काढून घ्या. गॅसवर एका भांड्यात एक कप साखर व तीन ते चार कप पाणी घालून त्यात साखर विरघळवून घ्या. नंतर त्यात कलिंगडाचे तुकडे घालून दहा मिनिटे उकळवा. उकळवलेले हे तुकडे वेगवेगळ्या चार कपांमध्ये घ्या. आता या प्रत्येक कपात लाल, पिवळा, हिरवा व केशरी रंग तसेच व्हॅनिला इसेन्सचे दोन-तीन थेंब घालून मिक्स करा. चार तास तसेच ठेवून नंतर चेरी काढून घ्या. सात ते आठ तास हवेवर सुकू द्या.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शर्वरी व्यवहारे, अहमदनगर