सीझर सलाड | ज्योती व्होरा | Caesar Salad | Jyoti Vohra

Published by Kalnirnay on   December 21, 2020 in   2020Recipes

सीझर सलाड

या पाककृतीमध्ये काही मूलभूत बदल केले असून, त्यामुळे हा पदार्थ रुचकर झाला आहे. तसेच याचे पौष्टिक मूल्यही जपलेले आहे.

साहित्य : १ लसणीची पाकळी, १ चमचा लिंबाचा रस, ३ चमचे मेयोनीज, १ चमचा वूस्टरशायर सॉस, १/२ चमचा डिजॉन मस्टर्ड, १ लहान सफरचंद किसलेले, १/२ कप लेट्युसची पाने बारीक चिरून, ६ लहान उकडलेले व सोललेले बटाटे (गार पाण्यात मीठ घालून बटाटे त्यात ठेवावेत), १/२ कप लाइट ऑलिव्ह तेल, ताजी काळीमिरी पूड, अर्धा कप चिरलेली कांद्याची पात, १ कप क्रॉउटन (ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडासा भाजलेला), बारीक किसलेले १/३ कप परमेसन चीज.

कृती : लसूण, लिंबाचा रस, वूस्टरशायर सॉस, मेयोनीज, डिजॉन 

मस्टर्ड आणि काळीमिरी ब्लेंडरमध्ये घाला. मऊ होईपर्यंत ब्लेंड करा. मध्यम स्पीडमध्ये ब्लेंडर ठेवून ऑलिव्ह तेल एका धारेत घाला. यात दोन चमचे थंड पाणी घाला, जेणेकरून ड्रेसिंगसाठी योग्य दाटसरपणा येईल. त्यात पाव कप परमेसेन चीज घालून मिश्रण फेटून घ्या. ते फ्रिजमध्ये ठेवा. एक मोठ्या सॅलेड बाऊलमध्ये लेट्युस, सफरचंद, लहान बटाटे, कांद्याची पात, क्राउटन आणि परमेसीन चीज घाला. त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रेसिंग करा आणि टॉस करा. त्यावर थोडे ऑलिव्ह तेल घाला. हळुवारपणे मिसळा आणि थंडगार सीझर सलाड खायला द्या.


ज्योती व्होरा