September 11, 2024

गुणसंपन्न दही

  1. दररोज आपल्या आहारातून एक वाटी ताजे दही घेतल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  2. दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, तसेच डोके शांत राहण्यास मदत होते.
  3. ताकामुळे अन्नपचनास मदत होते.
  4. आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठी दही उपयुक्त आहे.
  5. एक ग्लास ताक घेऊन त्यात मुलतानी माती मिसळा. या मिश्रणाने केस धुतल्यास केस निरोगी, दाट होतात.
  6. केसांत कोंडा झाला असल्यास एक कप दही घेऊन त्याने केसाला हलक्या हातांनी मसाज करा.आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपचार केला, तर कोंडा नाहीसा होईल व केस मुलायम होतील.
  7. दह्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. दही व व्हिनेगर एकत्र करून ते मिश्रण पायांच्या कोरड्या त्वचेला लावा. मृत त्वचा निघून जाईल.
  8. ताजे दही सकाळी किंवा दुपारी खाल्ल्यास कफाचा नाश होतो. आंबट दही खाल्ल्यास कफहोतो.
  9. रसायनयुक्त शाम्पू आणि रंगांचा वापर केल्याने केसांची चमक जाते. यावर उपाय म्हणून दह्यात बेसन मिसळून केसांना मुळापासून लावा आणि एकातासाने केस धुवा. त्यामुळे केसांची चमक परत येईल आणि केसातील कोंडाही कमी होईल.
  10. केसांमध्ये कोंडा झाला असल्यास दह्यात मिरपूड मिसळा आणि त्याने केस धुवा. आठवड्यातून हे दोनदा जरूर करा. त्यामुळे केसांमधील कोंडानाहीसा होऊन केस मुलायम, ज़ळे, लांब आणि दाट होण्यास मदत होईल.
  11. चेहऱ्यावर पुरळ येत असल्यास चेहऱ्यावर आंबट दह्याचा लेप लावा. हा लेप थोडा वेळ चेहऱ्यावर राहू दे. लेप सुकला, की चेहरा धुवून घ्या.थोड्याच दिवसांत तुम्हाला परिणाम दिसून येईल.
  12. मानेचा मागचा भाग काळा पडला असेल, तर स्नान करताना मानेवर आंबट दह्याने मालिश करा.नियमित हा उपाय केल्यास फरक पडेल.
  13. केस गळतीची समस्या असणाऱ्यांना एक वाटी आंबट दही, चार चमचे मुलतानी माती, चार चमचे शिकेकाई पावडर, अर्धा लिंबूरस, चार चमचे त्रिफळा चूर्ण एकत्र करून ते मिश्रण रात्री भिजवा आणि सकाळी मुळापासून लावून एक तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा अवश्य करा.
  14. कोरड्या त्वचेची समस्या असल्यास अर्धा कप गव्हाचा कोंडा, पाच चमचे दही आणि राईच्या तेलाचे काही थेंब टाकून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहरा, मानेला लावा. पंधरावीस मिनिटांनी वाळल्यावर पाण्याने धुवून घ्या.
  15. चेहरा ताजातवाना व्हावा यासाठी एक चमचा दह्यात दोन चमचे मुलतानी माती टाकुन पेस्ट बनवा.आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्या.
  16. दह्यात बेसन आणि गुलाब जल टाकून लेप तयारकरा. हा लेप चेहरा आणि मानेला लावा. वाळल्यावर चोळून चोळून काढा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचेचा अतिरिक्त तेलकटपणा कमी होऊन त्वचा उजळून निघेल.
  17. दही खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते व त्याचबरोबर रक्तदाबवरही दही लाभदायक आहे.
  18. दह्यामध्ये असणाऱ्या सी आणि डी व्हिटॅमिनमुळे हाडांबरोबरच दात मजबूत राहण्यास मदत होते.
  19. रोज १ चमचा दही खाल्ल्याने वजन आटोक्यात राहते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.