September 11, 2024
मोमोज | veg momos | upas momos | fasting momos | vrat momos | momos recipe | homemade momos | peanut dip

व्रत मोमोज विथ शेंगदाणा डीप | नम्रता श्रीश्रीमाळ, औरंगाबाद | Vrat Momos with Peanut Deep | Namrata Srisrimal, Aurangabad

व्रत मोमोज विथ शेंगदाणा डीप

मोमोजसाठी साहित्य: १ कच्चे केळे, १ बटाटा, १ काकडी, १ रताळे, १ तुकडा लाल भोपळा, २ हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तूप / तेल, १ छोटा चमचा सैंधव मीठ.

कव्हरसाठी साहित्य: १/२ कप साबुदाण्याचे पीठ, १/२ कप भगर, १ छोटा चमचा सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.

चटणीसाठी साहित्य: २ हिरव्या मिरच्या, १/२ कप भाजलेले शेंगदाणे, १/२ कप दही, १/२ छोटा चमचा सैंधव मीठ.

कृती: कच्चे केळे, बटाटा, लाल भोपळा आणि काकडी किसून घ्या. मिरच्यांचे छोटे तुकडे करा.  एका पॅनमध्ये थोडे तूप / तेल गरम करून सर्व पदार्थत्यात परतून घ्या. आता भगर पीठ व साबुदाण्याचे पीठ घेऊन त्यात सैंधव मीठ व गरजेनुसार पाणी घालून गोळा मळून घ्या. त्या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला वाटीचा आकार देऊन त्यात बनवलेले सारण टाका आणि मोमोचा आकार द्या. स्टीमरमध्ये १५ ते २० मिनिटे मोमोज वाफवून घ्या. मोमोजबरोबर खाण्यासाठी दह्याची चटणी बनवा. दही, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट व सैंधव मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून चटणी करा. गरमागरम व्रत मोमो तयार.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


नम्रता श्रीश्रीमाळ, औरंगाबाद

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.