पास्ता | indian style pasta recipe | desi pasta recipe | desi style pasta | indian style pasta | desi pasta

पौष्टिक पंचरत्न पास्ता | शैला काटे, मुंबई | Nutritious Panchratna Pasta | Shaila Kate, Mumbai

पौष्टिक पंचरत्न पास्ता

साहित्य: १ कप बार्ली, १ कप नाचणी, १ कप गहू, २ कप तांदूळ, १/२ कप मूग, १ मोठा चमचा सोयाबीन, १ मोठा चमचा मेथ्या. (बार्ली व तांदूळ धुऊन उन्हात कपड्यावर पसरवून वाळत घाला. इतर धान्य व मेथ्या वेगवेगळे धुऊन सकाळी भिजत घाला. रात्री कपड्यात बांधून मोड आणा.) नंतर दोन-तीन दिवस उन्हात वाळवून घ्या. बार्ली व तांदूळ सर्व धान्य एकत्र करून दळून आणा. पाणी, मीठ, अर्धा कप पालक पेस्ट, अर्धा कप बीट ज्यूस.

कृती: एका पातेल्यात दोन कप पाणी उकळत ठेवा. त्यात चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा तेल व दोन  कप मल्टीग्रेन पीठ घाला व उकड तयार करून घ्या. आता पातेल्यावर पाच मिनिटे झाकण ठेवा. उकड परातीत काढून घ्या व पाणी लावून पीठ मळून घ्या. त्याचे तीन-चार गोळे करून पातळ पोळ्या लाटा. उभे-गोल किंवा सोऱ्याने जाड शेवेची ताटली ठेवून नूडल्स करा. अशीच उकड पालक पेस्ट व बीटाचा ज्यूस घालून करा. पाहिजे त्या आकारात पास्ता तयार करा. प्लॅस्टिक पेपरवर घाला व उन्हात वाळवा.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


शैला काटे, मुंबई

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.