नूडल्स | Noodles recipe | homemade recipe

गहू नूडल्स | कांचन बापट | Wheat Noodles | Kanchan Bapat

गहू नूडल्स

साहित्य:/ वाटी कणीक, मीठ, तेल, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, प्रत्येकी / वाटी पत्ता कोबी, सिमला मिरची, कांदा,कांदापात, १ छोटा चमचा प्रत्येकी शेजवान सॉस, टोमॅटो सॉस.

कृती: कणीक, तेल, मीठ एकत्र करा. नेहमीपेक्षा थोडी घट्टसर कणीक मळून झाकून ठेवा. दहा-पंधरा मिनिटांनी एका मोठ्या पातेल्यात दीड लीटर पाणी गरम करा. त्यात एक लहान चमचा तेल घाला. सोऱ्याला जाड शेवेची चकती लावा. त्यात कणकेचा गोळा घालून थेट उकळत्या पाण्यात नूडल्स करून घाला. साधारण पाच-सात मिनिटे उकळवा. नूडल्स आधी पाण्यात बुडतात मग शिजल्यावर वर येतात. नूडल्स शिजल्यावर गॅस बंद करून थोडा वेळ झाकून ठेवा. नंतर निथळून थंड करा.

पसरट पॅनमध्ये एक-दोन मोठे चमचे तेल गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा, प॔ा कोबी आणि सिमला मिरची घालून परता. याशिवायही पाहिजे त्या भाज्या घालू शकता. मोठ्या गॅसवर भराभर
भाज्या परता. त्यात सोया सॉस, शेजवान आणि टोमॅटो सॉस घालून परता. त्यात तयार नूडल्स आणि लागेल तसे मीठ घालून परतून गॅस बंद करा. वरून कांदापात घालून द्या.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कांचन बापट

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.