इन्स्टंट दिवाळी अनारसा

Published by कालनिर्णय स्वादिष्ट on   October 11, 2017 in   Food Corner

साहित्य:

 • २ वाटी रवा
 • १ वाटी खाण्याचा डिंक
 • २ टेबलस्पून दही
 • एकतारी साखरेचा पाक
 • तळायला तूप
 • खसखस

तुमची खमंग फराळ रेसिपी पाठवा व जिंका आकर्षक बक्षिसे!

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

कृती:

 1. रवा दह्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवा.
 2. नंतर या गोळ्यात जाडसर कुटलेला डिंक घालून नेहमीच्या अनारशासारखे अनारसे खसखसवर थापून डीप फ्राय करा.
 3. डिंकाने ते छान फुलतात.
 4. नंतर याला साखरेच्या पाकात घालून लगेच काढा.
 5. पाक वापरावयाचा नसल्यास वरून पिठीसाखर घालून सर्व्ह करा.

 – कालनिर्णय स्वादिष्ट | नोव्हेंबर २०१५