सोड्याची खिचडी

Published by शीला प्रधान on   December 8, 2017 in   Food Corner

सोड्याची खिचडी बनविण्याकरिता –

साहित्य :


  • १ कप सोडे स्वच्छ धुवून, बारीक तुकडे केलेले
  • २ कप मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
  • १ कप तांदूळ (शक्यतो सुरती कोलम) धुवून घेतलेले
  • २ मध्यम आकाराचे बटाटे साले काढून व फोडी केलेले
  • १ टीस्पून हळद
  • २ टीस्पून तिखट (सीकेपी मसाला : मसाल्यातच धणे व थोडी बडीशेप असते)
  • चवीप्रमाणे मीठ
  • २-४ लवंगा
  • २-३ तुकडे एक इंच दालचिनीचे
  • ४-५ कमी तिखट हिरव्या मिरच्या
  • १ कप चिरलेली कोथिंबीर
  • १-२ तुकडे एक इंच आल्याचे
  • १ टेबलस्पून सुके खोबरे

पूर्वतयारी :


  1. आले, मिरची, लसूण, कोथिंबीर यांची बारीक वाटून गोळी तयार करावी. धणे, लवंग, दालचिनी, सुके खोबरे, एक कांदा भाजलेला, या सर्वांची पावडर करून घ्यावी.
  2. अर्ध्या नारळाचे घट्ट दूध काढून घ्यावे.

कृती :


  1. गॅसवर जाड बुडाचे पातेले तापत ठेवावे.
  2. तेलावर फोडणीला दोन लवंगा, एक-दोन दालचिनी, एक मसाला वेलची टाकावी.
  3. त्यावर कांदा फोडणीस टाकावा.
  4. तो चांगला परतला की, त्याच वेळी बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.
  5. त्या परतल्या की लगेचच मसाल्याची गोळी टाकावी.
  6. त्यानंतर हळद, सीकेपी मसाला (तिखट), मीठ घालावे.
  7. तांदळाच्या अडीच पट गरम पाणी पातेल्यात ओतावे.
  8. वाफ यायला लागल्यावर तयार करून ठेवलेले घट्ट नारळाचे दूध त्यावर ओतावे.
  9. त्याला चांगली वाफ येऊ द्यावी.
  10. त्याच्या आधी पातेल्याच्या खाली गरम तवा ठेवावा म्हणजे खिचडीला वाफ चांगली येते व ती करपत नाही.
  11. नंतर खिचडी तयार होत आल्यावर खिचडीवर साजूक तूप अलगद सोडावे.
  12. तयार केलेली कोथिंबीर खिचडीवर पसरून ती गरमागरम सर्व्ह करावी.

 – शीला प्रधान | कालनिर्णय स्वादिष्ट जुलै २०१७