सफरचंदाची टाॅफी

Published by Kalnirnay on   October 20, 2018 in   Food Corner

सफरचंदाची टाॅफी बनविण्यासाठी  –

साहित्य:

 • १ १/४ किलो सफरचंद
 • ७५० ग्रॅम साखर
 • २०० ग्रॅम लोणी
 • केशरी किंवा लाल रंग
 • १/२ टीस्पून सायट्रिक अॅसिड
 • चिमूटभर मीठ

कृती:

 1. सफरचंदाची साले व बिया काढून लहान तुकडे करून थोड्या पाण्यात मऊ शिजवा.
 2. पाणी गाळून तुकडे मॅश करून घ्या.
 3. त्यात साखर घालून शिजण्यास ठेवा.
 4. पन्नास ग्रॅम लोणी काढून ठेवा, उरलेले थोडे मिश्रणात घाला.
 5. टाॅफी झाली हे पाहण्यासाठी थंड पाण्यात थोडे मिश्रण घाला.
 6. गोळी झाल्यास टाॅफी तयार झाली समजा.
 7. एका ट्रेला थोडेसे लोणी लावून त्यावर त्यावर मिश्रण पसरा व त्यावर थोडेसे लोणी पसरवा.
 8. तुकडे करुन सर्व्ह करा.

Click here for more recipes