शाही तुकडा

Published by Mohsina Mukadam on   March 16, 2018 in   Food Corner

शाही तुकडा बनविण्यासाठी –

साहित्य

 • ६ ब्रेड स्लाईस
 • १ कप रबडी
 • ३/४ कप दूध
 • बदाम
 • पिस्ते
 • चारोळी
 • साजूक तूप
 • केशर

कृती

 1. ब्रेडच्या कडा कापून प्रत्येक स्लाईसचे त्रिकोणी दोन तुकडे करा.
 2. साजूक तुपात लालसर रंगावर तळून घ्या व पसरट प्लेटमध्ये हे तुकडे काढा.
 3. दूध गरम करून त्यात केशर घाला व हे दूध ब्रेडच्या स्लाईसवर घालून पंधरा मिनिटे ठेवा.
 4. नंतर ज्या प्लेटमध्ये सर्व्ह करणार असाल त्यात ब्रेडचे स्लाईस काढा.
 5. उरलेले दूध रबडीत घालून एकत्र करा.
 6. ब्रेड स्लाईसवर रबडी घाला.
 7. वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळीने सजवा.

 – मोहसिना मुकादम

तुमची रेसिपी ठरु शकते महाराष्ट्राची महारेसिपी! पाकनिर्णय २०१९ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.