बांबूचे सूप | मानसी गांवकर | रानभाज्या | Bamboo Soup | Mansi Gaonkar

Published by मानसी गांवकर on   December 28, 2020 in   रानभाज्या

बांबू चे सूप

मराठी नाव : बांबू

इंग्रजी नाव : Spiny Thorny Bamboo

शास्त्रीय नाव :  Bambusa arundinacea

आढळ : महाराष्ट्रातील सर्व जंगलात, नदी-ओढ्याच्या काठाने आढळून येतात. काही ठिकाणी बांबूची लागवडही केली जाते.

कालावधी : जुलै ते सप्टेंबर

वर्णन : बांबू हे जगातील सर्वात उंच वाढणारे गवत आहे. पाऊस पडला की बांबूचे नवीन कोंब जमिनीतून वर येतात. साधारणतः दोन फुटांपर्यंत वाढलेले हे कोवळे कोंब खाण्यासाठी वापरतात. हिरवट, पांढऱ्या रंगाच्या कोंबातील पांढरा गाभा खाण्यासाठी वापरला जातो.

साहित्य : बांबूचे २ कोवळे कोंब कापून रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. १ छोटा कांदा, ५ ते ६ फरसबी, ५ चमचे कापलेला कोबी, १/२ किसलेला गाजर, २ हिरव्या  मिरच्या, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ पेला व्हेज स्टॉक किंवा चिकन स्टॉक, १/२ चमचा मिक्स हर्ब्स१/२ चमचा काळीमिरी पावडर, २ चमचे नाचणीचे पीठ, २ चमचे लोणी किंवा तेल, चवीनुसार मीठ आणि साखर.

कृती : बांबूचे तुकडे शिजवून घ्यावे. लोणी/तेल गरम करून त्यात चिरलेली मिरची, आले-लसूण पेस्ट, कांदा घालून परतावे. त्यानंतर फरसबी, गाजर, कोबी टाकून एक वाफ येऊ द्यावी. त्यात शिजलेला बांबू आणि व्हेज किंवा चिकन स्टॉक टाकून परत उकळावे. नाचणीचे पीठ अर्धी वाटी पाण्यात कालवून हळूहळू सूपमध्ये ओतावे. सतत ढवळत राहावे. शेवटी मिक्स हर्ब्स, काळी मिरी पावडर, मीठ, साखर घालून एक उकळी आणावी.


मानसी गांवकर