September 19, 2024

मलीदा (कर्नाटकी पदार्थ)

साहित्य: 


  • ४ वाटी गव्हाचे (खपली गहू असेल तर उत्तम) पीठ
  • १ वाटी सुके खोबरे
  • एक वाटी (किंवा आवडीनुसार) गुळ
  • तूप साजूक १ १/२ वाटी
  • अर्धा टीस्पून सुंठ जायफळ पूड
  • खसखस अर्धी वाटी
  • आवश्यकतेनुसार मीठ

श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

कृती :


  • प्रथम गव्हाचे पीठ घेवून त्यात मीठ आणि अर्धी वाटी तूप घालून पोळीला भिजवतो तसे पीठ भिजवून २ तास ठेवणे.
  • नंतर त्याच्या पोळ्या लाटून थोडया तेलावर पोळ्या खरपूस भाजून घेणे.
  • गार झाल्यावर त्याचे थोडे थोडे तुकडे करुन मिक्सरला रवाळ वाटून घेणे.
  • सुके खोबरे किसून भाजून मिक्सरला थोडे फिरवून घेणे.
  • वाटून घेतलेल्या पोळयामध्ये खोबरे, गूळ, भाजून घेतलेली खसखस, सुंठ-जायफळ पूड, तूप आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करणे.

मलीदा खाण्यासाठी तयार.

वेळ :


६० मि. एकूण पूर्व तयारीसाठी १५ मि.

हा पदार्थ १०-१५ दिवस टिकतो.

टिपः संध्याकाळच्या छोटया भूकेसाठी उत्तम आणि पौष्टिक आहार आहे.


Seema Athnikar
Vashi

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.