फणसाचा पुलाव | कालनिर्णय फूड रेसिपी

फणसाचा पुलाव

साहित्यः


 • २ वाट्या तांदूळ
 • १ वाटी चिरलेला कांदा
 • २ टीस्पून लसूणपेस्ट
 • ४ टेबलस्पून तूप
 • १/२ वाटी चिरलेला टोमॅटो
 • चवीनुसार तिखट, मीठ
 • १/४ किलो फणस
 • ४ टीस्पून चहापत्ती
 • १/२ टीस्पून साखर

कृतीः


 • कांदा व लसूण वाटा.
 • वाटलेला कांदा व लसूण तुपावर परता.
 • थोडे लालसर झाले की त्यावर टोमॅटो, तिखट, मीठ व फणसाचे तुकडे घालून परता.
 • चांगले परतल्यावर त्यात थोडे पाणी घालून फणस शिजू द्या.
 • मिश्रण कोरडे करा.
 • दुसऱ्या एका पातेल्यात तुपावर कांदा परता.
 • त्याच पातेल्यात थोडे तेल घालून अर्धी वाटी चहापत्तीचे पाणी घाला.
 • नंतर थोडे मीठ व तांदूळ घालून भात शिजवा.
 • भात ८०% शिजल्यावर त्यात फणसाचे तुकडे व चवीनुसार साखर घाला.
 • झाकण लावून एक वाफ आणून पुलाव शिजवा.

 – कालनिर्णय स्वादिष्ट एप्रिल २०१५

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.