तांबुल बर्फी (विडयाच्या पानाची बर्फी)

साहित्य :


  • ९ ते १० विडयाची पाने
  • २ वाटी नारळाचा चव
  • सव्वा वाटी साखर
  • ३ चमचे पानाचा मसाला (बडीशेप, थंडाई (चिमुटभर)
  • गुंजेचा पाला
  • टुटीफ्रुटी
  • गुलकंद
  • खजुराचे काप
  • सुक्या खोबऱ्याचा कीस
  • मिल्क पावडर २ चमचे

कृती :


  1. पानाची देठे व शीरा काढा.
  2. वाटलेली पाने, नारळाचा चव, साखर, २ चमचे मिल्क पावडर घालून मिक्सरमधून काढा.
  3. हे मिश्रण कडा सुटेपर्यंत पॅनमध्ये शिजवा.
  4. थाळीला किंवा विडयाच्या पानावर तूपाचा हात फिरवून मिश्रण पसरवा.
  5. मध्ये पानाचा सर्व मसाला पसरुन परत बर्फीचे मिश्रण पसरुन सेट होईपर्यंत ठेवा.
  6. वरती कोको पावडर, साखर, खोबर परतून त्याची सुपारी बनवा.
  7. बर्फी सेट झाल्यावर पान काढा.
  8. त्यावर सुंदर पानाच्या रेषा उमटल्या असतील.

*करायला सोपी, सुटसुटीत, चवदार आणि हटके रेसीपी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारळ आणि पान यांचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन जे श्रावण महिन्यात अत्यंत शुभ.


Varsha Pradip Dobhada
Pune

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.