चिकन कबाब बटर मसाला

Published by Mohsina Mukadam on   May 16, 2018 in   Food Corner

 

तुमची रेसिपी पाठविण्यासाठी इथे क्लिक करा व आकर्षक बक्षिसे जिंका!

चिकन कबाब बटर मसाला बनविण्यासाठी  –

साहित्य:

 • १ किलो बोनलेस चिकन
 • १/२ कप टोमॅटो साॅस
 • २ कप क्रीम
 • १ टेबलस्पून लाल तिखट
 • १०० ग्रॅम बटर
 • १ टेबलस्पून कसुरी मेथी
 • २ अंडी
 • १ १/२ टेबलस्पून मैदा
 • मीठ
 • तेल

कृती:

 1. चिकनला मीठ, लाल तिखट लावून अर्धा तास मॅरिनेट करा.
 2. त्यात अंडे व मैदा घालून चांगले एकत्र करुन तेलात तळून घ्या.
 3. कढईत बटर वितळवून त्यात टोमॅटो साॅस आणि क्रीम घाला.
 4. गॅस मंद असू द्या.
 5. त्यात तळलेल्या चिकनचे तुकडे घालून सर्व एकत्र करा.
 6. कसुरी मेथी तव्यावर थोडी गरम करुन कुस्करुन चिकनवर घाला आणि सर्व्ह करा.

– Mohsina Mukadam