Your Cart

खुशखुशीत कंटोळी

साहित्यः


  • १० कंटोळी
  • १ वाटी किसलेले ओले खोबरे
  • १/२ वाटी पनीर
  • १/२ वाटी मावा
  • २ हिरवी मिरची, कोथिंबीर
  • आलं
  • तांदळाचे पीठ
  • कुरकुरीत नायलॉन शेव
  • चाट मसाला
  • मीठ

श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

कृतीः


  1. कंटोळीला देठाकडे कापून मीठ घातलेल्या पाण्यात उकळवावे.
  2. नंतर गाळून घ्यावे व आतील बिया अलगद काढाव्या.
  3. नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं एकत्रित करुन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
  4. त्यात ओले खोबरे, पनीर, मावा, मिरची-कोथिंबीरीचे वाटण, चाट मसाला, चवीपुरते मीठ घालून एकत्रित करावे.
  5. हे सारण हलक्या हाताने कंटोळीत भरावे.
  6. तांदळाच्या पीठात पाणी व थोडेसे मीठ घालून भजीच्या पीठाप्रमाणे भिजवावे.
  7. भरलेली कंटोळी त्यात बुडवून शेवात लपेटून तेलात डीप फ्राय करावे.
  8. वरुन शेव लावल्यामुळे कंटोळी तळल्यानंतर खुशखुशीत होतात.

Nitin Rane
(Vikhroli, Mumbai)

 

 

 

 

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.