खमंग मेथी पराठा

खमंग मेथी पराठा बनविण्यासाठी लागणारे-

 • साहित्य
 1. २ कप बेसन
 2. १/४ कणीक
 3. १/४ कँप बारीक रवा
 4. १/२ टीस्पून जिरे
 5. १/२ टीस्पून धणे
 6. ३-४ पाकळ्यांना लसूण
 7. २ हिरव्या मिरच्या
 8. १/२ टीस्पून अनारदाना
 9. १/२ कँप मेथीची पाने
 10. मीठ
 11. हळद
 12. तेल
 • कृती
 1. धणे, जिरे व अनारदाना तव्यावर कोरडे भाजून घ्या व लसूण व हिरव्या मिरच्या घालून खडबडीत वाटून घ्या.
 2. मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरा.
 3. कणीक, बेसन, रवा, मसाला, मेथी, मीठ व तेल घालून पीठ मळून घ्या.
 4. अर्धा तास कणीक मुरु द्या. नंतर जरा जाडसर पराठे लाटून त्यावर भाजून घ्या.
 5. लोणी, लोणच्यासोबत गरमा- गरम पराठा सर्व्ह करा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.