पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे (रस्सा व सुक्की)

साहित्य :


 • ४ लाल कांदे(बारीक चिरून)
 • २ (चहाचा)चमचा राई
 • १ मोठा चमचा तेल
 • ३ चिमुठ हळद व हिंग
 • मीठ(चवीनुसार)
 • २ (चहाचा)चमचा लाल मसाला
 • १ (चहाचा)चमचा गरम मसाला
 • पाव वाटी खसखस(बारीक वाटून)
 • सुके खोबरे(किंचित भाजून बारीक वाटून)
 • १ वाटी कोथिंबीर(बारीक चिरून)

कृती: 


 1. तीव्र आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे.
 2. राई तडतडल्यानंतर गँस मीडियम करा.
 3. त्यात कांदे घालून छान गुलाबी परतून घ्या.
 4. त्यात खसखस व खोबरे घालून ५-७ मि. नंतर हळद,हिंग,मीठ,लाल व गरम मसाला घाला.
 5. १०मि. परतून गँस बंद करून कोथिंबीर घातली की कांद्याची भाजी तयार.

टीप:ह्यात टोमॅटो व पाणी अजिबात वापरू नयेत.

 

*चटकदार चमचमीत रस्सा

साहित्य :


 • १ (चहाचा)चमचा राई
 • चिमुटभर हळद व हिंग
 • १ (चहाचा)चमचा लाल मसाला व गरम मसाला
 • १ (चहाचा) चमचा आले-लसूण -हिरवी मिर्ची भरडसर वाटून
 • १.१५ मोठा ग्लास पाणी
 • २ (चहाचे) चमचे
 • खसखस व भाजलेले सूके खोबरे(पाणी न वापरता बारीक वाटून)
 • १ मोठा चमचा तेल
 • १वाटी कोथिंबीर(चिरलेली)
 • मीठ(चवीनुसार)

कृती:


 1. तीव्र आचेवर भांड्यात तेल गरम करा.
 2. त्यात राई टाकून  तडतडल्यावर भरडसर वाटलेली आले-लसूण-हिरवी मिर्ची परतून घ्या.
 3. त्यात हळद व हिंग,खसखस व सुक्या खोबऱ्याचे वाटण ५ मि. परतून त्यात लाल मसाला व गरम मसाला,मीठ व पाणी घालून २ उकळी आल्यावर गँस बंद करा.
 4. त्यात चिरलेली कोथंम्बीर घातली की चटकदार चमचमीत रस्सा तयार.

टिप : रस्सात टोमॅटो घालू नये व रस्सा आटू नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

*सु्क्की कांद्याची फळे

साहित्य:


 • ४ वाटी गव्हाचे पीठ(मीठ,तेल व पाणी घालून मळलेले
 • तयार केलेली खमंग कांद्याची भाजी.

कृती:


 1. मळलेल्या कणकेचे लिंबाइतके गोळे घ्या.
 2. त्याची वाटी तयार करून त्यात तयार कांद्याची भाजी भरा.
 3. कणकेचा गोळा बंद करून घेऊन तयार केलेले कणकेचे गोळे १५ मि. मोदक पात्रात वाफवून घेतले की सु्क्की कांद्याची फळे तयार!

टिप: १.कणकेचा गोळा नीट बंद झाला की नाही ह्याची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून गोळा वाफवल्यावर फूटणार नाही.

       २.तयार सु्क्की कांद्याची फळे वाफवून त्यावर साजूक तुपाची धार सोडून गरमागरम खाण्यास फार स्वादिष्ट लागतात.

 

*पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे

साहित्य:


 • तयार केलेली सु्क्की कांद्याची फळे
 • चटकदार चमचमीत रस्सा
 • भरपूर चिरलेली कोथिंबीर

कृती:


 1. तयार चटकदार चमचमीत रशात तयार केलेली सु्क्की कांद्याची फळे सोडा.
 2. १/२-१ तास नंतर गरम करून गँस बंद करा.
 3. त्यावर चिरलेली कोथिंबीर घातली की पौष्टीक चटकदार चमचमीत खमंग कांद्याची फळे खाण्यास तयार.

टिप्स: १.सु्क्की कांद्याची फळे रंस्यात घातली की चमच्यानी हलवण्याची गरज नाही किंवा पुन्हा पुन्हा चमच्यानी हलवू नयेत ती  फूटण्याची शक्यता असते.

         २.तयार कांद्याची फळे जेवढे तास रंस्यात राहून मुरुन देऊन खाउ तेवढी जास्त स्वादिष्ट लागतात व ही नुसतीच खाण्याचा आस्वाद घ्यावा म्हणजेच रोजच्या चपाती व भाजी ला छान अपवाद. 


Varsha Karnekar

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.