साबुदाण्याची चकली

Published by Kalnirnay on   August 25, 2018 in   Food Cornerउपवासाच्या रेसिपी

साबुदाण्याची चकली बनविण्यासाठी  –

साहित्य:

  • १ वाटी साबुदाणा
  • अर्धा वाटी वऱ्याचे तांदूळ
  • मीठ
  • जिरे
  • पाणी

कृती:

  1. आदल्या दिवशी साबुदाणा धुवून ठेवणे.
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा वाटी पाणी उकळून साबुदाण्यात घालावे.
  3. वऱ्याचे तांदूळ भाजून स्वच्छ करुन अर्धा वाटी पाण्यात फळफळीत शिजवणे.
  4. साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ, मीठ, जिरे एकत्र कालविणे.
  5. हे चांगले मळणे व चकल्यांच्या सोऱ्यातून चकल्या पाडणे व उन्हात वाळविणे.

टीप: ह्या चकलीत बटाटा घालू नये. त्याने चकली चिवट,कडक होते. 

Click here for more recipes