महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. १ ध जमीन, पाणी, हवा व ऊर्जा याचीउपलव्यता सर्वत्र सारख्या प्रमाणात नसल्यामुळे जेथे जो प्ले घटक विशेष अनुकूल रूपात आहे तेथे त्याच्यापासून अधिकाधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने व्यवहारांची व्यवस्थाबसवावी लागते. विदर्भातल्या काळ्या जमिनीचा सलग विस्तुत प्रदेश हे विदर्भाचे फार मोठे शक्तिस्थान प्रागैतिहासिक काळापासून आहे. अवर्षणप्रवण प्रदेशांपुढे असणाऱ्या अडचणीला तेथे क्वचितच सामोरे जावे लागते.

म्हणून तेथे सघन शेतीचा विकास करून प्रति हेक्टरी उत्पादकतावाढवणे सोपे आहे. त्यासाठी शेतीला नव्या सिंचन व्यवस्थांची जोड देण्याचे प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळात चालू आहेत. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची बांधकामे पूर्ण झाल्यावरसिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नवे पाणी काळ्यामातीच्या शेतीत यशस्वीपणे कसे वापरात आणले जाणार ही प्रारंभीची अनेक वर्षे एक चिंतेची बाब होती. पण सिंचन सहयोगाच्या चळवळीने निर्माण केलेल्या नव्या सामाजिक वातावरणामुळे व शासनाच्या प्रोत्साहनामुळे काटेपूर्णा कालव्यांच्या लाभक्षेत्रात सहकारी सामुदायिक वितरण संस्थांची सर्वत्र उभारणी होऊन, गेल्या पाच वर्षांत तेथील चित्र आमूलाग्र बदलले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनाचे पाणी मिळायला लागून नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन प्रकल्पाचा २५वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला. प्रकल्पाची उभारणी करणारे २५ वर्षांपूर्वीचे अभियंते यांना तर आठवणीने निमंत्रित करूनशेतकऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलाच पण त्याबरोबरचप्रकल्पामुळे विस्थापित झालेले जे ग्रामीण बंधू पुनर्वसित झाले आहेत,त्यांनाही अगत्याने या वाढदिवसाच्या समारं भास बोलावूनत्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा भावपूर्ण गौरव कार्यक्रमहीझाला. अशा या तरल जाणिवा ही एक प्रेरकशक्तीच आहे.विदर्भाच्या अति पूर्वेकडील वैनगंगा खोऱ्यात पिकांना अनुकूलअशा कसदार जमिनी कमी आहेत, पण निसर्गतः पाण्याची विपुलउपलब्धता आहे. तेथे इतिहासकालापासून जागोजागी पाण्याचे हजारो तलाव बांधण्यात आले आहेत. त्यांतील पाण्याच्या आधारावर उसासकट विविध प्रकारची उत्तम पिके तेथे परंपरेने घेतली जात असत. गोंडकालीन राजवटींमध्ये या तलावांभोवतीच्या लोकप्रणीत व्यवस्थांना प्रोत्साहन मिळालेले असल्याने तलावांच्या आधाराने बहरलेल्या त्या जिल्ह्याचे नावच मुळी भंडारा ( भांडार ) असे पडले होते. शेती उत्पादनात एके काळी आघाडीवर असलेला हा प्रदेश वनप्रदेशांच्या मालकीबाबतच्या अलीकडील एकांगी वनकायद्यामुळेअधिकारवादी शासनप्रवण व्यवस्थेच्या विळख्यात अडकला आहे.समाजाच्या वाढत्या आधुनिक गरजांच्या संदर्भात ज्या प्रमाणात वनखात्याच्या ताब्यातील जमिनींच्या वापराबाबत तेथे डोळस भूमिका घेतली जाईल व सिंचनाखालील पिकांचीही फेरआखणी होईल त्या प्रमाणात वैनगंगा खोऱ्यातील विकासाचा मार्ग पुनश्च प्रशस्त होईल.

गोंडकालीन तलावांची निमिर्ती व व्यवस्थापन यांत त्या काळातआघाडीवर असलेला कोहळी समाज भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्यानव्या आत्मनिर्भर वातावरणात केवढी उंची आता गाडू शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणजे भंडारा-गोंदिया मार्गावरील कोहळी-टोलाहे गाव. गावकऱ्यांच्या परिश्रमांतून उभे राहिलेले गावाच्या मालकीचे चार सिंचन तलाव, गावक्षेत्रातील सर्व झाडांची काटेकोरखानेसुमारी व नोंद ठेवण्याची गावाची पद्धत, कोणती झाडेवापरासाठी केव्हा कापावयाची याबाबत गावाने केलेले वर्षनिहायनियोजन, संगीतासह सर्व विषयांच्या बहुरंगी शिक्षणाला उचलूनधरणारे गावातील आधुनिक माध्यमिक विद्यालय व गावठाणातीलसर्व बांधीव रस्ते असे विदर्भाच्या भविष्याचे आनंददायी रूप तेथेसाकारलेले आहे.महाराष्ट्राच्या अन्य प्रदेशांमध्ये जमिनीची प्रतवारी किंवा पाण्याची उपलब्धता विदर्भासारखी अनुकूल नाही. पण जमीन आणि पाणी यांची सुयोग्य सांगड घालून मर्यादित पाण्याचा विस्तुत जमिनीवर अधिकाधिक लाभदायी उपयोग करून घेण्यासाठी सामूहिक पाणीवाटप व्यवस्था ग्रामीण जीवनात वाढत्या संख्येने आता पुढे येत आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या परिसरांमध्ये विज्ञाननिष्ठ बहुहंगामी शेती, दुग्ध विकास, फलोद्यान विकास व फुलशेतीचा विकास घडून येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यासारखा अवर्षणप्रवण तालुका आणि त्यातील पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असणारे माण खोरेसुद्धा आज विकास व्यवस्थेत अग्रेसर आहे. जगभर नावाजलेले तेथील गणेश डाळिंब,द्राक्षे, दुग्ध विकास, पशुधन विकास यांच्या माध्यमातून झालेला त्या भागाचा अभूतपूर्व विकास अनुकरणीय ठरला आहे. दरवर्षी एक हजार कोटींहून अधिक उत्पन्न घेणारे म्हणून विकासाचे पदवीधर असे जे पाच ग्रामीण तालुके गणले जातात – रावेर (जि. जळगाव), निफाड ( जि. नाशिक), कोल्हापूर, बसमतनगर ( जि. परभणी) वसांगोला, त्यांत सांगोल्याने मानाचे स्थान मिळविलेले आहे, ते तेथील तरुण पिढीच्या उपक्रम-शीलतेमुळे. पावसाळ्यातील तीन महिन्यांचे ढगाळ वातावरण सोडले, तर नंतर स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वरदान महाराष्ट्राला लाभले आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या सौरशक्तीचा ज्या प्रमाणात विविध अंगांनी उपयोग शक्य आहे, त्या प्रमाणात मात्र अजून तो झालेला नाही. फुलांना सुवासदेण्याची किमया सूर्यकिरणे करीत असतात. फळांना स्वाद देण्याची किमयासुद्धा ही सूर्यकिरणेच करीत असतात. त्यामुळे ढगाळ युरोपीय वातावरणात जे जमू शकत नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात स्वादिष्ट, सुगंधी व आकर्षक फळाफुलांची वाढ महाराष्ट्रात सहज शक्य आहे. कोकणातील हापूस आंबा अथवा मराठवाड्याचा केशर आंबा किंवा नगर-नाशिक जिल्ह्यांमधील फुलशेती त्याच्याच आधाराने आजव ५ आघाडीवर आहे. कृषि-उत्यादनाच्या टिकाऊपणासाठी व निर्जतुकी- अकरणासाठीसुद्धा महाराष्ट्रातील स्वच्छ सूर्यकिरणांचा व कोरड्या हवामानाचा विशेष लाभ उठवता येण्यासारखा आहे.द्राक्षांचे बेदाण्यांत रूपांतर करणे, अननस, केळी यांचे टिकाऊकापांमध्ये रूपांतर करणे अशा सोम्या घरगुती प्रक्रियांना ग्रामोद्योग म्हणून चालना मिळते आहे. नाशिक-निफाड-दिंडोरी किंवा मिरज-जत-सांगोला या रस्त्यांच्या दुतर्फा असलेले बेदाणे-मनुका यांचे वाळवण ताटवे या तेथील ग्रामीण विकासाच्या भाग्यरेखाच आहेत. पाण्याच्या चणचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन! सूक्ष्मसिंचन अशा पाणीवापराच्या नव्यापद्धती अंगीकारल्या आहेत. आधुनिक सिंचन व्यवस्थेखालीलदेशातील शेतीपैकी निक्याहून अधिक शेती महाराष्ट्रात आहे. दोन लाखांहून अधिक हेक्टर वरील शेती ठिबक सिंचन पद्धतीने फुलवली जात आहे. विशेष म्हणजे ठिबक सिंचनाची सर्व प्रकारची आधुनिकतम उपकरणेसुद्धा महाराष्ट्रातच जळगावसारख्या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्यांच्या आंतराष्ट्रीय निर्यातीतूनही कीर्ती मिळत आहे. खेर्डी (चिपळूण) येथील लघुउद्योगांतून सच्छिद्र खापरांच्या वापराने सूक्ष्मसिंचनाची नवी पद्धती कोकणात विस्तारत आहे.

देवरूख ( रत्नागिरी जिल्हा) येथील मातृमंदिर संस्थेने सामाजिकविकासाला तंत्रज्ञानाची व सामूहिक कार्यशक्तीची यशस्वी जोड देऊन परिसरात व्यापक परिवर्तन घडवून दाखवले आहे. महाराष्ट्रभरच्या अशा या व्यापक जागतीमुळेच दरवर्षी संक्रांतीनंतर भरणाऱ्या महाराष्ट्र सिंचन परिषदेला हजारो कार्यकर्ते वारकऱ्याप्रमाणे आपली उपस्थिती लावीत आहेत. महानगर -केंद्रित विकासापासून अलग होऊन शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाची स्वतंत्र स्वयंभू केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र पुढे येत आहेत. उदा. वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सामावणारे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगरचे शैक्षणिक संकुल, भिलवडीच्या परिसरातील दुग्ध संकुल, इचलकरंजीचे औद्योगिक संकुल, नांदेड जिल्ह्यातील सगरोळीसारख्या सीमावर्ती गावात स्थानिक देणगीतून उभी राहिलेली सैनिक शिक्षणाची निवासी शाळा व त्याबरोबरची संस्कृत माध्यमाची अभिनव शाळा महाराष्ट्राला विविध क्षेत्रांतील आघाडीचे विद्यार्थी पुरवीत आहे. तेथेच पुनर्वसित परिक्यता स्त्रियांना आठआठ निराश्रित मुलांचे आईपण सोपवणारी सुंदर सामाजिक नवी मुक्तांगणे बहरलेली दिसत आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदरा येथे उभ्या राहिलेल्या निवासी नवोदय विद्यालयातून ही अशीच शिस्तीत वाढणारी पिढी पुढे येत आहे. ग्रामीण स्तरावर गेल्या २५ वर्षात झालेल्या शैक्षणिक विस्तारामुळे एकेकाळी आडवळणी वाटणाऱ्या लातूरसारख्या गावातून आणि मराठवाड्यातील अहमदपूरसारख्या लहानशा तालुक्याच्या गावातूनही शालान्त परीक्षांतील गुणवान विद्यार्थ्यांची अखंड परंपरा निर्माण झालीआहे. आडगाव ( जालना), राळेगण शिंदी ( नगर), सोमनाथ,आनंदवन वरोडा ( चंद्रपूर), यमरखाडी (उस्मानाबाद) येथील विविध उपक्रमांमधून महाराष्ट्राचा नवा जोम केवळ आर्थिक पुनर्रचनेतच नव्हे तर सामाजिक पुनर्रचनेतही महाराष्ट्राला पुढे नेताना दिसतो आहे. सामाजिक विकासाचे नवे आदर्श अहमदनगरच्या हिरवेबाजार या खेड्यात किंवा शिरूर (जि. पुणे) परिसरातील मोराची चिंचोली या गावाभोवतीच्या १२ – १३ गावांत सलगपणे डौलाने उभे आहेत. एके काळी दरोडेखोरीसाठी बदनाम झालेल्यांमधून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन व आधुनिक हरितगृहे यांच्या साहाय्याने समृद्धीचे नवे माळकरी निर्माण झाले आहेत.ज्येष्ठ नागरिकसंघाची साखळी महाराष्ट्रात वाढली आहे. अनुभवसंपन्नता व त्याबरोबरच क्रियाशीलता साथीला घेऊन अनेक ज्येष्ठ मंडळी सेवाभावी उपक्रमांमध्ये वाढत्या संख्येने भाग घेऊ लागली आहेत. एकमोठीच जाणकार शक्ती महाराष्ट्राच्या विविधांगी प्रगतीला महत्त्वाचे खतपाणी घालीत आहे. लहान-मोठे नवनवे अनेकउपक्रम, व्याख्यानमाला, सुट्ट्यांमधील शेकडो संस्कार शिबिरे, वाचनालये, प्रबोधन केंद्रे, सेवाभावी आरोग्य केंद्रे महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांमध्ये आता पुढे येत आहेत. गडचिरोलीसारख्या वनक्षेत्रीय जिल्ह्यातसुद्धा नवरगांव-सारख्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मराठी विज्ञान परिषदेची शाखा कार्यरत झालेली आहे. महाराष्ट्राचे भविष्यातील नवे चित्र कसे राहणार आहे याचा संकेत देणारे हे नवे धुमारे आहेत.


माधव चितळे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.