निवृत्ती नियोजन : केव्हा ? कसे ? कुठे ?

वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्ती नियोजनाला सुरुवात करणे म्हणजे खूप उशिरा सुरुवात करण्यासारखे आहे. निवृत्ती नियोजनाला खरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षीच सुरुवात करणे हितावह असते.

निवृत्ती नियोजनाची गरज :

(१)वाढलेले आयुर्मा : वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेतसेच बदललेल्या गुणवत्तापूर्ण राहणीमानामुळे सरासरी आयुष्यवाढते आहे. निवृत्तीनंतर आपल्याला २५ ते ३० वर्षे जगायचे आहे आणि तेही सन्मानाने !

(२)वाढते वैद्यकीय खर्:

वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आपले सरासरी आयुर्मान जरी वाढलेले असले तरी वैद्यकीय औषधांचा खर्च परवडण्यापलीकडे गेला आहे, हेही तितकेच खरे आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदी आजारांसाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च हा दरमहा बजेटचा एक प्रमुख भाग बनला आहे आणि त्यासाठी नियमित तरतूद करून ठेवावी लागणार आहे.

(३)वाढती महागा : सतत वाढणारी महागाई ही एक मोठीसमस्या आहे. एकूण राहणीमानाचा खर्च वाढतो आहे. निवृत्तीनंतर तर याची झळ जास्त जाणवण्याची शक्यता आहे. कारण साधारणपणे साठीनंतर नव्याने पैसे मिळविण्याची क्षमता कमी कमी होत जाते.

(४)विभक्त कुटुंब पद्धती: एकत्र कुटुंब पद्धत लयाला चाललीआहे. समाजात आजूबाजूला घडत असलेल्या घटना पाहता लग्नानंतर मुलगा आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने त्याच्या आई-वडिलांचा सांभाळ करेलच, याची खात्री देता येत नाही.

(५)पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या: निवृत्तीनंतर आजीवन पेन्शनदेणाऱ्या नोकऱ्या संपलेल्या आहेत. अगदी सरकारी नोकरीतही २००५ नंतर रुजू होणाऱ्या व्यक्तीला सरकार आता पेन्शन देणार नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरची आर्थिक व्यवस्था ज्याची त्यालाच करावी लागणार आहे.

या सर्व मुद्द्यांचा विचार करता निवृत्ती नियोजनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

मग नियोजन म्हणजे काय? आणि निवृत्ती नियोजन म्हणजे काय? उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानकाळात करायचे प्रयत्न म्हणजे नियोजन! आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तरुणपणातच पैसे गुंतवण्याची प्रक्रिया सुरू करणे म्हणजे निवृत्ती नियोजन! जेणे करून आपण (आणि आपला जोडीदार) जिवंत असेपर्यंत आर्थिकदृष्ट्या परावलंबी जीवन जगण्याची वेळ न येता स्वतःच्या आर्थिक शक्तीवर सक्षम राहता येईल. आपल्या एकूण उत्पन्नापैकी काही भाग नियमितपणे विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणे आणि निवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी विशिष्ट फंड निर्माण करणे, हे निवृत्ती नियोजन यशस्वी करण्याचे रहस्य आहे.

निवृत्ती नियोजन करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत?

. सध्याचे वय.

. सध्याचा दरमहा खर्च.

. निवृत्तीचे वय.

. अपेक्षित आयुर्मान.

. भविष्यातील अपेक्षित भाववाढ.

. सध्याची गुंतवणूक आणि त्यावर निवृत्तीच्या वेळेपर्यंत मिळणारा अपेक्षित परतावा.

. निवृत्तीनंतर मिळणारा अपेक्षित परतावा.

या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला निवृत्तीनंतर दरमहा किती रक्कम लागेल, याचा ढोबळ अंदाज येईल. तसेच ही रक्कम मिळण्यासाठी

त्यावेळी एकूण किती रक्कम (भांडवल) तयार होणे जरूर आहे, याचाही एक अंदाज येईल आणि ही रक्कम तयार होण्यासाठी आत्तापासून दरमहा किती रक्कम गुंतवणे आवश्यक आहे, हेही समजेल. या संदर्भात जाणकार गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे योग्य!

निवृत्ती नियोजनासाठी उपलब्ध गुंतवणूक योजना : यामध्ये दोन प्रकारे गुंतवणूक करता येईल. तरुण वयात दरमहा/वार्षिक पद्धतीने गुंतवणूक करून किंवा निवृत्त होताना एकरकमी गुंतवणूक करून! खरे म्हणजे या दोन्ही पर्यायांचे अवलंबन करणे हिताचे!

दरमहा/वार्षिक पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी खालील योजनांचा विचार करता येईल :

. पुनरावर्ती ठेव योजना – पोस्ट ऑफिस (अथवा सरकारी बँका).

. किसान विकास पत्र – पोस्ट ऑफिस.

. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र – पोस्ट ऑफिस.

. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी – पोस्ट ऑफिस (अथवा सरकारी बँका).

. म्युच्युअल फंड दरमहा पद्धतशीर योजना (एस. आय. पी.).

. राष्ट्रीय पेन्शन योजना – सरकारी/खाजगी बँका किंवामान्यताप्राप्त ब्रोकिंग कंपन्या.

निवृत्त होते वेळी एकरकमी पैसे गुंतविण्यासाठी खालील योजनांचा विचार करता येईल :

. वय वंदन योजना – भारतीय आयुर्विमा महामंडळ.

. पोस्टाची दरमहा योजना – पोस्ट ऑफिस.

. वरिष्ठ नागरिक बचत योजना – पोस्ट ऑफिस.

निवृत्ती नियोजनासाठी तरुण वयात नियमित गुंतवणूक करताना आयुर्विमा (टर्म प्लॅन) आणि आरोग्य विमा घेण्यास विसरू नये.

आर्थिक उदारीकरणाच्या या नव्या युगात व्याजदर कमी-कमीच होत जाणार. या पाश्र्वभूमीवर तुम्ही दोन वर्षांनी निवृत्त होणार आहात का २० वर्षांनी; हा मुद्दा गौण ठरतो. तुम्ही कधी ना कधी निवृत्त होणार आहात हे वास्तव महत्त्वाचे ठरते. यासाठी वेळीच आर्थिक योजना आखणे शहाणपणाचे ठरेल. तसे घडल्यास आयुष्याची संध्याकाळ सोनेरी आणि उबदार होईल !

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.