गृहोद्योग | डॉ. मेधा पुरव- सामंत | Work From Home | Working Women | Productivity | Workaholic

गृहोद्योगाचा सूर्योदय: डॉ. मेधा पुरव-सामंत

. गृहोद्योग साठी भांडवल कसे उभारावे?

पुण्यामुंबईबरोबरच इतर लहानमोठ्या शहरांतूनही मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या, नॉन बँकिंग कोप्रतीओन, तसेच ना नफाना तोटा तत्वावर चालणार्या संस्था कार्यरत आहेत, ज्या अगदी गरीब महिलांनादेखील उद्योगधंद्यासाठी भांडवल पुरवतात.

गरीब स्त्रियांहून थोडा वरचा वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे तारण, जामीन आहे. अशा स्त्रियांसाठी बरेच पर्याय आहेत. बऱ्याचशा सहकारी बँकां अशा महिलांना कर्ज देतात. यासाठी त्यांनी नवरा किंवा घरातली एक व्यक्ती आणि बाहेरचे दोन जामीनदार उभे करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे पगाराची स्लीप आहे, अशा महिलांना लाख टे दोन लाख भांडवल पर्सनल लोन खाली सहज उभे करता येऊ शकते. खाजगी बँकां, तसेच को.- ऑप. बँकां आणि शेड्युल्ड बँकां हे कर्ज उपलब्ध करून देतात. हल्ली बहुतांश बँकां कर्ज देताना महिलांना प्राधान्य देतात, त्यामुळे भांडवलाची समस्या कमी झाली आहे.

२. आपल्या व्यवसायासाठी मोठे ध्येय कसे ठेवता येईल?

मी इथे ध्येय मोठे नाही, तर ‘सुयोग्य ध्येय असले पाहिजे ‘ असे म्हणेन. आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, यांची दुकाने नाक्यानाक्यावर, गल्लोगल्ली दिसून येतात. ज्याला प्रचंड स्पर्धा व ज्यात सामान्य कौशल्य असणाऱ्या व्यवसायाचा पर्याय अवलंबा आणि सुयोग्य ध्येय बाळगा.

आपण व्यवसायासाठी किती वेळ देऊ शकतो, हासुद्धा महत्वाचा भाग आहे. कौशल्य आणि वेळ हे समीकरण जुळविल्यावर आपले ध्येय आखताना महिलांनी असा विचार करायला हवा, की माझ्याकडे जागा आहे की भाड्याने घ्यावी लागणार आहे. भाड्याने जागा घ्यायची झाल्यास गुंतवणूक आली. ते पैसे आपल्या खिशातून जाणार. जर घरातील जागाच आपण यासाठी वापरू शकत असू, तर भाड्याचा खर्च वाचू शकतो. त्यामुळे ध्येय ठेवण्याआधी माझे कोणते कौशल्य आहे, माझ्याकडे किती वेळ आहे आणि त्यासाठी स्वतःची की भाड्याची जागा उपलब्ध आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी. यानंतर प्रश्न येतो, तो म्हणजे घरच्यांचे सहकार्य मी कसे मिळवीन?

अनेक महिला उत्साहाच्या भरात व्यवसायाला सुरुवात करतात. नवरा, सासूसासरे सुरुवातीला सहकार्य करू असे म्हणतात. पण हळूहळू ते कमी होत जाते, त्यांना मदत करणे जमत नाही. मग सगळी धावपळ आपल्याला करावी लागते, जे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला घरच्यांचे किती आणि कसे सहकार्य उपलब्ध आहे, याचा त्या महिलेने आढावा घेतला पाहिजे. सहकार्य नसेल, पण कुटुंबीयांशी चर्चा करून, संवाद साधून ते मिळवता येणे शक्य आहे का किंवा काही पर्याय निर्माण करता येतील का ते पाहावे.

एकूणच सुयोग्य ध्येय आखताना आपले कौशल्य, आपण किती तास काम करू शकतो, जागा आहे का, घरच्यांचे सहकार्य कसे मिळवता येईल या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

. स्पर्धा मोठी की सहकार्य?

गृहोद्योग करायचा, तर आपले कौशल्य काय आहे, त्यातून आपल्याला किती पैसे मिळू शकतात, हे बघायला हवे. त्याचबरोबर आपल्या कामाचे पैसे आकारताना दर स्पर्धात्मक हवा. तुमच्या कामाचा दर इतरांपेक्षा अधिक असेल, तर काम मिळणार नाही आणि कमी असेल, तर तुमचे नुकसान होईल. त्यामुळे तुम्हाला बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले स्पर्धक आपल्याला माहित असायला हवेत आणि या स्पर्धकांशी आपली, ‘हेल्दी कॉम्पिटीशन असली पाहिजे. स्पर्धकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करून आपल्या सगळ्यांनी थोडे वेगवेगळे ग्राहक/मार्केट शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. एकमेकांचा धंदा मारण्याचा प्रयत्न करू नये, ते चुकीचे ठरते. त्यामुळे स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य हे तत्व अवलंबणे अधिक फायद्याचे ठरेल.

. मार्केटिंग कसे करावे?

आपले काम नव्याने सुरु करत आहात. ही नुकती सुरुवात असल्यामुळे फार मोठे स्वप्न लगेच पाहायला नको. जागतिक बाजारपेठेचे स्वप्न पाहण्याची ही वेळ नाही. यासाठी अजून बराच वेळ आहे. इतर कुणाकडेच उपलब्ध नसणारे काम तुम्ही करत असाल आणि त्याची बल्क ऑरदर घेणे शक्य असेल, तरच निर्यात शक्य आहे, अन्यथा नाही.

सध्या तुम्ही घराजवळील आपल्या टप्प्यात असलेले मार्केट शोधा ज्या मार्केटमधील बदलते ट्रेंड्स आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, अशा मार्केटचा विचार करा.मार्केटमध्ये रोज बदल होत असतात. त्या ट्रेंडनुसार बदलत राहणे आवश्यक आहे. आपण कपडे शिवून विकत असू, तर आपल्याकडे कौशल्य हवे. माल बाहेरून आणून विकत असू, तर नफ्याचे प्रमाण किती ठेवायचे हे ठरवा. मार्केटमधील बदलत्या ट्रेंडनुसार अपडेटेड राहा. त्याचबरोबर आपल्या मर्यादा माहित करून घ्या. निव्वळ हौस म्हणून, घर सांभाळून वेळ मिळेल तेव्हा व्यवसाय करायचा आहे की खरेच, हा व्यवसाय आपण सातत्याने करू इच्छितो का ते आधी समजून घ्या.

आपण देत असणाऱ्या वस्तूचा/ सेवेचा दर्जाही उत्तम असायला हवा. त्याच्या जोडीने पेकेजिंग आणि प्रेझेन्टेशन महत्वाचे आहे. घरी बनविलेले पदार्थ, वस्तू तुम्ही विकत असाल, तरी त्याला आकर्षक ब्रेन्डींग करा. बदलत्या मार्केटनुसार आपल्या प्रौदाक्त आणि पेकेजिंमध्ये बदल करायला हवे. तसेच त्यात अतिरिक्त नावीन्य आणायचा प्रयत्न करा. सोशल मीडियाचाही यासाठी तुम्हाला फायदा करून घेता येईल.

बक्व्र्दफोरवर्ड लिंकेजेस (म्हणजे आपल्या धंद्याला लागणाऱ्या कच्चा मालाच्या वापरातून – बक्वर्द आणि तयार उत्पादनापासून इतर उत्पादन बनवणे – फोरवर्ड) सारखा आणखी एखादा धंदा करता येतो, का ते पाहा. माल (सोर्सिंग) कुठून येणार त्याकडेही लक्ष द्यायला हवे. प्रत्येक वेळी आपण स्वतः जाऊन स्वतः जाऊन माल खरेदी करण्यापेक्षा तिकडे संपर्क स्थापन करा, पैसे पोचवा आणि घरपोच माल मिळवा. मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायात सातत्य हवे. एकाच धंद्यात तुम्ही टिकून राहणे महत्वाचे आहे. आज रांगोळी, उद्या शिवणकाम, परवा वेगळेच काहीतरी असला प्रकार करू नका. यामुळे तुम्ही कोणताही धंदा धड करू शकणार नाही.

. कर्मचारीवर्ग कसा निवडावा?

गरज नसेल, तर कर्मचारी ठेवू नका. आपला व्यवसाय कोणता, त्यातील उलाढाल किती, उत्पन किती याचा विचार आधी करा. त्यानुसार मग आपल्याला व्यवसायात खरेच मदत हवी असेल, तर कर्मचारी ठेवा. स्वतःला काम करावे लागू नये किवा इतरांना सांगण्यासाठी / दाखविण्यासाठी बरेच जण नोकरवर्ग ठेवतात. पण तसे करू नका. शक्य तेवढे काम स्वतः करा. व्यवसायाचा अवाजवी पसारा वाढवू नका. जमेल तेवढ्या कमी खर्चात अधिक व्यवसाय करा.

कर्मचारी ठेवायचे झाल्यास किमान वेतन कायद्याप्रमाणे (मिनिमम वेज एक्त) कर्मचार्यांना पगार द्यावा लागेल हा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. कर्मचार्यांचा पगार देऊन त्यापेक्षा अधिक रक्कम आपल्या हातात आली पाहिजे, हा हिशोब आधीच करायला हवा. नाहीतर नुकसानच अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापेक्षा आपल्या घरातील सदस्यांची मदत व्यवसायात मिळू शकेल का, हे बघा.

. गृहोद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच आवश्यक परवानग्या कोणत्या व बँक अकाउंटचे महत्व काय?

घराबाहेर, तसेच घरगुती स्तरावर व्यवसाय करणार असाल, तर शॉप एन्ड इस्ताब्लीश्मेंत आक्त लायसन्स आणि पेन कार्ड आवश्यक आहे.

तुम्ही दुकान किंवा टपरी घेत असाल, तर महानगरपालिकेची टेक्स पावती आणि गुमास्ता लायसन्स काढावे लागते.

तुम्ही जर अन्नपदार्थ विकणार असाल, जर तुम्हाला फूड अंड ड्रग अक्त अंतर्गत लायसन्स घ्यावे लागते आणि दरवर्षी ते रिन्यू करावे लागते.

आधार कार्ड तर आता सगळ्यांसाठी बंधनकारक झाले आहे.

त्याचबरोबर वेगळे बँक अकाउंट उघडून आपल्या धंद्याचे ठराविक उत्त्पन्न बँकेत टाकायला हवे व त्याच खात्यातून व्यवसायासाठीचा खर्चसुद्धा केला पाहिजे. बँकेमार्फत आपल्या उत्पन्नाच्या एन्त्रीज ठेवायला हव्यात. याचा फायदा बँककेकडून कर्ज घेतेवेळी होईल. बँकेच्या/ चेकच्या माध्यमातून व्यवहार झाल्यास त्याच्या एन्ट्रीज मिळतात आणि त्या आधारे बँक आपल्याला हवे असणारे कर्ज मंजूर करताना काही प्रश्न उभे करत नाही. टक्स वाचविण्यासाठी रोखीने व्यवहार कराल, पण नंतर जेव्हा धंदा वाढविण्यासाठी कर्ज हवे असेल तेव्हा तुम्हाला बँकेला आपल्या व्यवसायाची उलाढाल कर्ज काढण्यासाठी कशी दाखवता येणार? यासाठी सामान्य ज्ञान वाढवा, बँकेचे व इतर आर्थिक व्यवहार समजून घ्या. स्मार्टनेस वाढवा. बँक मेनेजार्नेही तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करू शकतात.

. जीएसटी आदी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?

जीएसटीचा मुद्दा गृहोद्योग च्या बाबतीत तेवढा लागू होत नाही. २० लाखांहून अधिक उलाढाल असणार्या व्यवसायांसाठी जीएसटी लागू होतो. महिलांसाठी आयकर मर्यादा तीन लाख करण्यात आलेली आहे आणि २० लाखांच्या खाली जीएसटीचा मुद्दा काही लागू होत नाही. त्यामुळे हा मुद्दा आता एवढ्यात लक्षात घेण्याचे कारण नाही.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्या साठी आमच्या BLOG ला भेट द्या.


डॉ. मेधा पुरवसामंत

 अन्नपूर्णा परिवार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.