काढा | decoction medicine | natural medicine | herbal medicine | alternative medicine

खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा | वैद्य अश्विन सावंत | Decoction For Winter Season | Dr Ashwin Sawant

खास शिशिर ऋतूसाठी औषधी काढा

गुण व उपयोग॒: हेमंत ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या पूर्वार्धात थंड-आल्हाददायक वातावरण, शरीराची वाढलेली ऊर्जायुक्त आहाराची गरज व अनावर भूक यामुळे पौष्टिक आहार मुबलक मात्रेत सेवन केला जात असल्याने शिशिर ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्याच्या उत्तरार्धात हा काढा घेणे स्वास्थ्यासाठी अतिशय योग्य. शरीरामध्ये कफ व मेद (चरबी) वाढू न देण्यास उपयुक्त.

घटकद्रव्ये॒: काडेचिराईत, नागरमोथा, सुंठ प्रत्येकी दोन ग्रॅम.

काढा तयार करण्याची पद्धत आणि मात्रा (डोस)॒: वरीलपैकी जे पदार्थ उपलब्ध असतील ते  कुटून स्टीलच्या भांड्यात किंवा मातीच्या मडक्यात तीन कप पाण्यात मिसळवा. पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवावे व गाळून कोमट झाल्यावर प्यावे.याप्रमाणे दिवसातून दोन किंवा तीन वेळा काढा बनवून प्यावा. ही मात्रा १८ वर्षांवरील (सरासरी ५० किलो वजनाच्या) निरोगी प्रौढ व्यक्तींसाठी आहे. १० ते १८ वयोगटासाठी (साधारण २५ ते ५० किलो वजनाच्या व्यक्तींसाठी) पाव कप, तर ५ ते १० वयोगटामधील लहान मुलांना दोन चमचे (१० मिलिलीटर) आणि २ ते ५ वयोगटातील मुलांना एक चमचा (५ मिलिलीटर) द्यावा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 वैद्य अश्विन सावंत

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.