कालनिर्णय दिवाळी अंक २०२३
तापमान वाढीचा जगभरातील पर्यावरणावर झपाट्याने होणारा परिणाम, आधुनिक अमेरिकन साहित्यकार घडवणाऱ्या संपादक मॅक्सवेल पर्किन्सचा प्रवास, ज्येष्ठ लेखक, संशोधक प्रा. अ. का. प्रियोळकर यांचे काहीसे दुर्लक्षित राहिलेले ललितलेखन, सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाच्या विविध छटा उलगडून दाखवणाऱ्या तीन सिनेमांची पन्नाशी, सौंदर्य आणि कसदार अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या आशा पारेख, शर्मिला टागोर आणि वहिदा रहमान या अभिनेत्रींचा सिनेसृष्टीतील प्रवास, सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्या लेखणीने अजरामर झालेल्या संगीत नाटकांचा मागोवा, प्रत्येक नव्या चित्रपटासह नवनवीन तरुणींच्या प्रेमात पडणारा हॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक रॉबर्टो रोसेलिनी आणि बंगाली सुंदरी सोनाली दासगुप्ता यांची प्रेमकहाणी, व्यंगचित्रातून व्यक्तींची गर्दी रेखाटणारे व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचा कलाप्रवास, नैसर्गिक वस्तूंच्या मदतीने मोकळ्या आकाशाखाली कलाकृती साकारणारे अँडी गोल्डसवर्दीच्या कलाकृतींचा घेतलेला आढावा, लोककलावंत मंजम्मा जोगती यांचा प्रेरणादायी प्रवास, जागतिक बाजारपेठांवरील चिनी कूटनीतींचा प्रभाव, जोखमीकडे दुर्लक्ष करत पैशांच्या आमिषाने जुगार खेळणाऱ्यांची मानसिकता, व्यवसायासोबत देशसेवेचे व्रत घेतलेल्या ‘श्री सरस्वती प्रेस’चा प्रेरणादायी इतिहास, मराठ्यांचा इतिहास बदलणारे पालखेडचे युद्ध तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘काली काला’ या पुस्तकाला डॉ. अशोक कामत यांनी दिलेली प्रस्तावना, हायकू आणि सेनऱ्यू, पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कथा, कविता, व्यंगचित्रे, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२३’ मध्ये वाचता येईल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
Reviews
There are no reviews yet.