निवृत्ती नियोजन : केव्हा ? कसे ? कुठे ?

वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्ती नियोजनाला सुरुवात करणे म्हणजे खूप उशिरा सुरुवात करण्यासारखे आहे. निवृत्ती नियोजनाला खरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षीच सुरुवात करणे हितावह असते. निवृत्ती नियोजनाची गरज : (१) वाढलेले आयुर्मान : वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेतसेच बदललेल्या गुणवत्तापूर्ण राहणीमानामुळे सरासरी आयुष्यवाढते आहे. निवृत्तीनंतर आपल्याला २५ ते ३० वर्षे जगायचे आहे आणि तेही सन्मानाने ! […]

सुदृढ आरोग्य- संस्कृती

अलीकडेच युरोपीय देशांत फिरण्याचा योग आला. सुंदर हिरवी कुरणे व चंदेरी हिमाच्छादित डोंगरमाथे सर्वांनाच भुलवतात. पण त्याहूनही रम्य अशी काही दृश्ये माझ्या मनावर कोरली गेली. रुंद, सहा पदरी रस्ते, पादचाऱ्यांसाठी व सायकलींसाठी स्वतंत्र लेन, शिस्तबद्ध नीरव रहदारी, सार्वत्रिक स्वच्छता आणि त्याहून सुंदर म्हणजे निर्धास्तपणे कानाला संगीत लावून जॉगिंग करीत असलेल्या सर्वसाधारण महिला! सायकली चालवत रपेट […]

सँडविच | Ribon Sandwich | Food Recipe | Home Made

रिबन सँडविच

रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सँडविच ब्रेड मस्का बेसन मीठ हळद तेल ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले). हिरवी चटणीः १ कप कोथिंबीर १/२ कप पुदिना १ लहान तुकडा आले ३-४ लसूण पाकळ्या २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून जिरे लाल चटणीः २-३ टोमॅटो १ टीस्पून लाल तिखट १/४ कप टोमॅटो सॉस १ छोटा बीटचा […]

सरबत | कैरीचे जांभळे सरबत | Raw Mango Juice | Marathi Recipe | Homemade

कैरीचे जांभळे सरबत – आदिती पाध्ये

कैरीचे जांभळे सरबत बनवण्यासाठी लागणारे- साहित्य: २ मध्यम कैऱ्या (साधारण २ वाट्या कैरीचे तुकडे) १/२ वाटी काळ्या मनुका १ लहान आकाराचे बीट (बिटाचे तुकडे १/२ वाटी) गोडीसाठी १ १/२ वाटी काकवी २ वाट्या लिक्विड गूळ चिमूटभर मीठ १/२ लहान चमचा जायफळ पूड कृती: काळ्या मनुका दोन तास पाण्यात भिजवून ठेवा. कैरी व बिटाचे छोटे तुकडे […]

उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचावे कसे?

१) जेवणात कांद्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतो कच्चा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात खावा. २) उन्हाळ्यात तहानेने जीव बेजार होतो. कितीही पाणी प्याले तरी शोष पडल्यासारखा वाटतो. दिवसभर असे सारखे पाणी पीत राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवण कमी होते. हे सगळे टाळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी फक्त पेलाभर प्याले तरी दिवसभर तहानेने जीव व्याकूळ होत नाही. ३) पुष्कळांना उन्हाळा […]

महती ज्ञानेश्वरीची

ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अलौकिक असा ग्रंथ आहे. त्याची महती सांगताना ज्ञानकोशकार डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश (२१वा विभाग) यामध्ये असे लिहिले आहे की, ‘‘ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील ‘काव्यारावो’  म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथे यादव कुलांतील राजे रामदेवराव हे देवगिरीस राज्य करीत असताना लिहिला. मराठी भाषेतील श्रीमद् भगवद्-गीतेवरील […]

निद्रानाश

झोप ही सर्व मनुष्यांना व सर्व प्राणिमात्रांना निसर्गाने दिलेली एक अमोल देणगी आहे व ती एक महत्त्वाची शारीरिक व मानसिक गरज आहे. भूक व तहान यांसारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी थोडी अधिक मेहनत किंवा कष्ट घ्यावे लागतात. परंतु झोप ही मात्र कशीही कुठल्याही जागी (बसल्या-बसल्यासुद्धा) सहज मिळणारी, पूर्ण विश्रांती देणारी व हुशारी आणि हुरूप देणारी सुखावस्था […]

पाणी आणि संस्कृतिबंध

जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’कालीन आणि ‘हेमंत’कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. या हेमंतकालीन उत्पादनात तीळ हे एक […]

मोदक | ganpati Modak

दुधरसातले मोदक | Milk Modak

दुधरसातले मोदक साहित्य: ४ वाट्या आटवलेले दूध १ वाटी तांदळाची पिठी १/२ वाटी गूळ १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप सुका मेवा केशर कृती: तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून […]

They mysteries of modern life.

आधुनिक जीवनातील गूढवाद

आजच्या जगाचा व्यवहार सुरू आहे, तो विवेकवाद, विज्ञान आणि भांडवलशाही या तीन घटकांवर आधारित. या तीन घटकांमुळे अभूतपूर्व अशी समृद्धी निर्माण करण्यास मदत झाली आहे. किंबहुना, मानवाच्या इतिहासात प्रथमच आपल्याला गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्याची संधी मिळाली आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या राजेरजवाड्यांनी जो ऐषोआराम भोगला नसेल, तो ऐषोआराम आणि ती जीवनशैली आजचा मध्यमवर्ग उपभोगत आहे. पण तरीही […]