मुंबईतील एका मित्राच्या घरी मी बसलो होतो. वेळ सकाळची होती. ” गुड मॉर्निंग अंकल ‘(इंग्रजी) -शाळेत जाण्याच्या तयारीत असलेली मित्राची दोन अपत्यं एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर आली आणि थोडा वेळ असल्यानं कोचावर बसली. मी नमस्काराचा स्वीकार केला आणि त्यांना सहज विचारलं, ” कोणत्या शाळेत जाता तुम्ही?” मुलं उत्तरण्याच्या आतच माझा मित्र हसत म्हणाला, […]









