याकारणें मियां। गीतार्थु मऱ्हाठिया। केला लोकां यया। दिठीचा विषो॥ -ज्ञानेश्र्वरी १८ वा अध्याय ज्ञानेश्र्वरांचा काळ देवगिरीच्या यादवांचा. ज्ञानेश्र्वरांनी ग्रंथाच्या समारोपात ‘सकलकलानिवासू’ म्हणून रामचंद्र राजाचा आणि यदुवंशाचा निर्देश केला आहे. हा काळ महाराष्ट्रात शांततेचा, सुबत्तेचा आणि तरीही विविध धार्मिक आंदोलनाचा होता. महानुभाव, वीरशैव, नाथ, जैन, लोकायत इ. संप्रदायाचा आणि विचारप्रणालीचा प्रभाव त्या काळात बराच असावा. विशेषतः […]
