तंदूर आइस्क्रीम नट्स रोल
साहित्य: २०० ग्रॅम मैदा, १० ग्रॅम खाण्याचा सोडा, ५ ग्रॅम बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, ८० ग्रॅम बटर, १५० ग्रॅम पिठीसाखर, एका अंड्याचा पिवळा भाग, १५० ग्रॅम शुगर क्रीम, अर्धा किलो मीठ.
सारणाचे साहित्य : प्रत्येकी २० ग्रॅम काजू, बदाम, अक्रोड, मगज बिया, भोपळ्याच्या बिया, साखर, एका अंड्याचा फक्त पांढरा भाग.
सारणाची कृती: सारणाच्या साहित्यातील सर्व बिया, नट्स एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या. एका बाऊलमध्ये अंड्याचा पांढरा भाग व साखर घालून फेटा. त्यात वाटलेल्या बिया घालून चांगले एकजीव करून घ्या.
पारीची कृती: एका बाऊलमध्ये मैदा, खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, मीठ, साखर, बटर घालून चांगले एकजीव करा. त्यात अंड्याचा फक्त पिवळा भाग, शुगर क्रीम घालून चांगले मळून घ्या. मळलेला हा गोळा झाकून ठेवा. दहा मिनिटांनंतर गोळ्याचे चार समान भाग करा. एका गोळ्याची मोठी पोळी लाटून त्याचे आठ भाग करा. एक-एक भागामध्ये सारण भरून रोल करा. त्याआधी कढईमध्ये अर्धा किलो मीठ ठेवून दहा मिनिटे गॅसवर ठेवा. या मिठावर जाळी ठेवून त्यावर तयार रोल ठेवा. त्यावर झाकण ठेवा. वीस मिनिटांनंतर रोल पलटून घ्या आणि परत झाकण ठेवा. परत वीस मिनिटांनी झाकण काढून रोल काढून सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
क्षिप्रा गवळी, विरार
