नारळाचा केक
साहित्य: १ कप ओल्या नारळाचा चव, १ कप रवा, १ कप साखर, १ कप दही, १ छोटा चमचा सोडा, वेलचीपूड, टूटीफ्रुटी, मैदा.
कृती: एका भांड्यात नारळाचा चव, रवा, साखर, दही हे एकत्र करून दोन तास तसेच ठेवा. तव्यावर वाळू ठेवून तापवत ठेवा. केक पात्राला तुपाचा हात लावून त्यावर थोडा मैदा घालून सगळीकडे पसरवा. जास्तीचा मैदा काढून घ्या. मिश्रणात सोडा, टूटीफ्रुटी, वेलचीपूड घालून चांगले एकजीव करून घ्या. केक पात्रात मिश्रण ओतून हे भांडे तव्यावरील वाळूवर ३५ ते ४० मिनिटे भाजून घ्या. त्यानंतर टूथपिकने केक झाला की नाही हे तपासून घ्या. केक थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढा.
टीप: हा केक ओव्हनमध्ये १६० अंश सेल्सियस तापमानावर बेक करता येईल. केकमध्ये टूटीफ्रुटीऐवजी ड्रायफ्रूट घालू शकता.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रिया पंचभाई, पुणे
