टँगो बार
साहित्य: ५०० ग्रॅम सीडलेस खजूर (पेस्ट करून घेतलेले), ६० ग्रॅम बदाम, काजू, ५० ग्रॅम अक्रोड, ३० ग्रॅम पिस्ता, ४० ग्रॅम भोपळ्याच्या बिया, ३० ग्रॅम चीया सीड, २० ग्रॅम राजगिरा (सर्व नट्स आणि सीड्स भाजून घ्या.) १२ ग्रॅम कोको पावडर, १० ग्रॅम तूप.
कृती: भाजून घेतलेले बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया यांचे सुरीने छोटे-छोटे तुकडे करा. कढईत तूप गरम करून त्यामध्ये खजुराची पेस्ट घालून दोन मिनिटे परतवा. या मिश्रणामध्ये तुकडे करून घेतलेल्या सगळ्या बिया, चीया सीड, भाजलेला राजगिरा, कोको पावडर हे सगळे मिश्रण पाच मिनिटे मंद गॅसवर एकजीव करून घ्या. या मिश्रणाचा घट्ट गोळा करा. हा गोळा गरम असतानाच त्याला त्रिकोणी आकाराचा लांबसर बारचा आकार द्या. हा बार फ्रीजमध्ये तीन ते चार तास ठेवा. त्यानंतर त्याचे त्रिकोणी आकाराचे काप करा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अर्चना चौधरी, पुणे
