Constipation Relief | Digestive Health | Healthy Eating | Natural Remedies | Gut Car | Bowel Health | Daily Wellness | Balanced Diet | Medical Advice

बद्धकोष्ठता, रेचके आणि आरोग्य | डॉ. आनंद नांदे | Constipation Explained: From Causes to Cure | Dr. Anand Nande

बद्धकोष्ठता, रेचके आणि आरोग्य

बद्धकोष्ठता म्हणजे काय ?

बद्धकोष्ठतेची व्याख्या करणे खरेतर खूप अवघड आहे. याचे कारण मलनिःस्सारणाचा पल्ला विस्तृत आहे. काही व्यञ्चती दिवसातून दोन ते तीन वेळा शौचास जातात, तर काही दोन ते तीन दिवसांतून एकदा शौचास जातात. साधारणतः आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे, याला बद्धकोष्ठता समजले जाते. बद्धकोष्ठतेची व्याख्या शौचास जाऊन देखील पोट साफ न झाल्याची भावना होणे, ही आहे. श्वासाची दुर्गंधी, डोकेदुखी, पोटात गॅस होणे, पोट फुगणे, भूक न लागणे, अपचन, पोटात दुखणे ही सर्व बद्धकोष्ठतेची लक्षणे असू शकतात.बद्धकोष्ठतेची कारणे आणि उपचार याबाबत चर्चा करण्यापूर्वी पचनक्रिया कशी असते ते आपण पाहू.

पचनसंस्थेचे कार्य :

एकदा तोंडावाटे अन्न गिळल्यानंतर त्याचा प्रवास तोंडापासून गुदद्वारापर्यंत समन्वयित लाटेप्रमाणे होत असतो. याला वैद्यकीय परिभाषेत पेरिस्टालसीस (Peristalsis) किंवा आंत्रचलन असे म्हणतात. ही स्वयंचलित यंत्रणा आहे. ही यंत्रणा आतड्यांमधील नसांमुळे नियंत्रित केली जाते. जरी ही यंत्रणा स्वयंचलित असली तरी तिच्यावर मेंदूचा काही प्रमाणात प्रभाव असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तणाव आंत्रचलनाची प्रक्रिया वाढवतात. याला आपण ‘लढा किंवा पळा’ (Fight or Flight) अशा प्रकारचा प्रतिसाद मानतो. आपण सर्वांनी हा अनुभव महत्त्वाच्या परीक्षांपूर्वी घेतला आहे. कसोटीच्या/संकटाच्या वेळेस शौचास जाण्याचे प्रमाण वाढते.

पचनक्रिया ही छोट्या आतड्यात पूर्ण होते. आवश्यक ते पदार्थ
रञ्चतामध्ये शोषून घेतले जातात आणि उर्वरित चोथा व पाणी मोठ्या आतड्यामध्ये जाते. तेथे बरेचसे पाणी हळूहळू शोषून घेतले जाते आणि घट्ट मल तयार होतो. मोठ्या आतड्याचा आकार छोट्या आतड्यापेक्षा जवळजवळ तिप्पट असल्यामुळे असा मल पुढे सरकवण्यास मोठ्या आतड्यातील स्नायूंना पकड मिळते.

 हा मल गुदद्वारातून बाहेर टाकला जातो. मानवी पचनसंस्थेमध्ये वनस्पतीच्या पेशीचे आवरण, ज्याला सेल्यूलोज (Cellulose) म्हणतात, याचे पचन होऊ शकत नाही. म्हणून मलाचा बहुतांश भाग हा सेल्यूलोजने बनलेला असतो. यालाच सर्वसाधारण भाषेत फायबर (Fibre) असे म्हणतात. साधारणतः १०० ते १२० मिलिलीटर पाणी मलातून जाते. या पाण्यामुळे मल मऊ राहतो, ज्याने तो बाहेर पडण्यास मदत होते. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, जर आपण तंतुमय पदार्थांचे सेवन केले आणि भरपूर पाणी प्यायलो तर मल विपुल आणि मऊ होईल.

बद्धकोष्ठतेची कारणे :

* तंतुमय पदार्थांचा अभावः भरपूर प्रमाणात फळे, पालेभाज्या, धान्ये (whole grains) यांचे सेवन न करणे. मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ यामध्ये तंतूंचे प्रमाण अतिशय कमी असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

* पाण्याची कमतरता :  पाण्याअभावी मल कोरडा आणि कठीण होतो. परिणामी तो बाहेर ढकलण्यास अडचण निर्माण होते.

* व्यायामाचा अभाव : दररोज भराभर चालणे (brisk walking), व्यायाम, योगासने यामुळे आतड्यांना उत्तेजना मिळते आणि मल बाहेर ढकलण्यास मदत होते. बैठी जीवनशैली पचन आणि आतड्यांची हालचाल मंद होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे बैठे काम हे बद्धकोष्ठतेचे एक महत्त्वाचे कारण आहे.

* शौचाच्या भावनेकडे दुर्लक्ष करणे : काही व्यञ्चती शौचाच्या भावनेकडे दुर्लक्ष किंवा कंटाळा करतात. असे वारंवार करण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शौचाची भावना आल्याबरोबर ताबडतोब शौचास जायला हवे.

* दीर्घकालीन आजार : काही वैद्यकीय विकारांमुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते. हायपोथायरॉडीझम (Hypothyroidism), दीर्घकालीन मधुमेह, पार्किन्सन आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोमच्या (IBS) रुग्णांमध्ये बद्धकोष्ठतेचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

* औषधांचा परिणामः काही औषधे बद्धकोष्ठतेस कारणीभूत होऊ शकतात. उदा. अफूपासून बनविलेली वेदनाशामके, अॅल्युमिनियम आणि कॅल्शियमचा अंतर्भाव असलेली अँटासिड्स आणि नैराश्यासाठी दिलेली औषधे. तणाव, चिंता आणि उदासीनता आतड्यांच्या हालचालींवर देखील परिणाम करू शकते.‍

* दिनचर्येत बदल : दैनंदिन दिनचर्येतील बदल, प्रवास किंवा जेवणाच्या नियमित वेळा चुकल्यामुळे आतड्यांमधील हालचालींवर परिणाम होऊ शकतो.

* ज्येष्ठांना होणारा त्रास : प्रौढांमध्ये बद्धकोष्ठतेची विविध कारणे असू शकतात. आहारातील फायबरयुञ्चत पदार्थांचा अभाव, द्रव पदार्थांचे किंवा पाण्याचे अपुरे सेवन, बैठी जीवनशैली आणि काही औषधांमुळे शौचास त्रास होऊ शकतो.

बद्धकोष्ठतेवरील औषधांचे वर्गीकरण :

* बल्क रेचक (Bulk laxatives) : तंतूपूरक औषधे मलाचे प्रमाण वाढविण्याचे काम करतात. उदा. इसबगोल.

* ऑस्मॉटिक रेच‍क (Osmotic laxatives) : या औषधांमुळे मलामध्ये पाणी शोषून घेतले जाते, ज्यामुळे मल मऊ बनतो.

* ल्युब्रिकण्ट रेचक (Lubricant laxatives) : उदा. पॅराफीन ऑईल. अशी औषधे वंगणासारखे काम करतात.

* इरिटण्ट रेचक (Irritant laxatives) : उत्तेजक रेचक या वर्गातील औषधे मोठ्या आतड्याच्या अस्तराला उत्तेजित करतात आणि आंत्रचलनाचा वेग वाढवितात. उदा. एरंडेल तेल.

रेचके कोणी घ्यावीत?

ज्येष्ठ नागरिकांना किंवा एखाद्या रुग्णाच्या आजाराचे स्वरुप पाहून त्याला रेचके घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्येष्ठांमध्ये पचनसंस्थेची आणि आतड्यांची शञ्चती कमी झालेली असते. त्यामुळे पोट साफ  होण्यासाठी त्यांना रेचके दिली जातात. पण हे प्रमाण ज्येष्ठांचे वय, त्यांना असलेले आजार आणि बद्धकोष्ठतेचा होणारा त्रास या सर्व गोष्टी पाहून दिल्या जातात. वयाने कमी असलेल्या रुग्णांना किंवा तरुणांना रेचके घेण्याचा सल्ला फारच कमी प्रमाणात दिला जातो. काही कारणांनी एखाद्या रुग्णाला शौचास होत नसल्यास किंवा काही शस्त्रक्रियेनंतर पोट साफ  होण्यासाठी रेचके दिली जातात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा देखरेखीखाली घेतली गेली पाहिजेत. यातील काही रेचकांमुळे शरीराला त्याची सवय होऊ शकते. म्हणून ती अत्यंत काळजीपूर्वक घेतली गेली पाहिजेत. रेचकांच्या सततच्या सेवनाने काहींना पोटात वायू तयार होणे, उलट्या, जुलाब, पोटात कळा येणे असे त्रास होऊ शकतात. तर बऱ्याचदा रेचक न घेतल्यास शौचास न होण्याची समस्या उद्भवते.

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी :

* दररोजच्या जेवणाच्या वेळा निश्चित करणे आणि वेळच्या वेळी सावकाश अन्न ग्रहण करणे. प्रत्येक घास १२ ते १४ वेळा चावणे.

* आहारात फायबरयुञ्चत पदार्थांचा समावेश करणे. भरपूर प्रमाणात ताजी फळे, पालेभाज्या, धान्ये, कोशिंबीर (salads) खाणे. यामुळे शौच मऊ होण्यास मदत होते. काळे हरभरे, राजमा, चणे यांसारखे पदार्थ खाणे टाळावे.

* दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि मल मऊ होतो.

*  अतिरिञ्चत तंबाखू सेवन अथवा मद्यसेवन टाळा.

* नियमित व्यायाम केल्याने पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.

* पचनक्रियेवर तणाव आणि चिंता यांचा परिणाम होतो, त्यामुळे ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे. तसेच कामाची व झोपण्याची वेळ निश्चित करणे.

बद्धकोष्ठता कधी गंभीर होते?

बद्धकोष्ठता हा एक सामान्य आजार आहे. पण दीर्घकालीन बद्धकोष्ठता हे अनेक आजारांचे कारण बनू शकते. बद्धकोष्ठता दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास तीव्र वेदना, रञ्चतस्राव, कारणाशिवाय वजन कमी होणे, आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल, उलट्या, पोटदुखी किंवा ताप यासारखी गंभीर लक्षणे दिसू लागतील. अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. आनंद नांदे

(लेखक बॉम्बे हॉस्पिटलचे अनुभवी सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि एंडो-लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.