अल्फल्फा आणि पपईचे पॉवर पॅक थालीपीठ
साहित्य: १/४ कप मोड आलेले अल्फल्फा (एक प्रकारचे बी), १ कप किसलेली कच्ची पपई, १/२ कप बारीक चिरलेला पालक, १ बारीक चिरलेला कांदा, २ छोटे चमचे आले-मिरची- लसूण- कोथिंबीर यांची भरड, १ मोठा चमचा पांढरे तीळ, १ छोटा चमचा काळे तीळ, १ छोटा चमचा ओवा, १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ कप भाजणीचे पीठ किंवा मिश्र पीठ, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, भाजण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती: एका मिक्सिंग बाउलमध्ये पपई, अल्फाल्फा, पालक, कांदा, आले-मिरची-लसूण-कोथिंबीरीची भरड, पांढरे-काळे तीळ, ओवा, कोथिंबीर एकत्र करा. या मिश्रणाला पाणी सुटू द्या. पाच मिनिटांनंतर या मिश्रणात भाजणीचे पीठ घालून एकजीव करा. त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रणाचा गोळा तयार करा. थालीपीठाचा गोळा घेऊन ओल्या रुमालावर थालीपीठ थापून घ्या. तव्याला तेल लावून त्यावर थालीपीठ थापून भाजून घ्या.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
शीतल राऊत, वसई
