डॉक्टर नसेल तेथे | मूळ लेखक: डेव्हिड वेर्नर | Doctor Nasel Tethe | David Warner

400.00

Features


मूळ लेखक  : डेव्हिड वेर्नर
प्रस्तुत आवृतीचे मुद्रक, प्रकाशक : जयराज साळगावकर, सुमंगल प्रेस (प्रा.)लि.,मुंबई
प्रमुख संपादक : डॉ. रमेश पोतदार
मुद्रक : सुमंगल आर्टेंक, अंधेरी, मुंबई
रेखाचित्रे : मुकुंद तळवलकर
पृष्ठ संख्या : ४९०
प्रकाशन दिनांक (सहावी संपूर्ण सुधारित आवृत्ती मराठी आवृत्ती) : मार्च २०२१
मुद्रण स्थळ : सुमंगल आर्टेक, अंधेरी, मुंबई
आरोग्य
डॉक्टर नसेल तेथे | मूळ लेखक: डेव्हिड वेर्नर | Doctor Nasel Tethe | David Warner 400.00

आरोग्य

‘कालनिर्णय’ आणि ‘स्त्रीहितकारिणी’ व ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ स्पेशल चेंज’ ह्यांनी संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर नसेल तेथे’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मूळ लेखक डेव्हिड वेर्नर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची ही संपूर्ण सुधारित सहावी मराठी आवृत्ती आहे. ‘कालनिर्णय’ आणि ‘CSSC’ ह्यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले आरोग्य चांगले रहावे, असे वाटत असते. अशा सर्वांसाठीच ‘डॉक्टर नसेल तेथे’ हे पुस्तक उपयोगी पडू शकते. साधी बोलीभाषा, योग्य रेखाचित्रांनिशी देण्यात आलेली वैद्यकीय माहिती ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. कठीण परिस्थितीत, आपात्कालीन समयी, तसेच छोट्या गाव-पाड्यांत थोड्याशा सामुग्रीनिशी स्वस्तात आरोग्य सुविधा कशा मिळवायच्या आणि रोगप्रतिबंधन कसे करायचे यांचे मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकातून मिळते. सर्व वयोगटातील सामान्य नागरिक, आरोग्य रक्षक तसेच आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनाही या पुस्तकाचा रोजच्या वापरात उपयोग होऊ शकेल.

डॉक्टर नसेल तेथे‘ हे मूळ पुस्तक म. गांधी आणि विनोबा यांच्या समाजकार्याने प्रेरित होऊन मेक्सिकोच्या डेविड वैर्नर यांनी लिहिले होते. त्याच्या ५७ आवृत्या विविध देशांत प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतील पहिल्या दोन आवृत्या महाराष्ट्र शासनातर्फे तर पुढील चार आवृत्या ‘कालनिर्णय’तर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

यातील ग्रामीण ‘आरोग्यरक्षकाशी हितगुज’ या प्रकरणात आरोग्यरक्षकाने कसे कार्य करावे याबद्दल अनेक उपयुक्त सूचना आढळतील. समाजाच्या गरजा कशा ओळखाव्या, ज्ञानात त्यांना सहभागी कसे करावे व आरोग्याच्या कार्यात सर्व समाजाला कसे गुंतवावे याबद्दलचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.