सर्वपित्री दर्श अमावास्या म्हणजे काय? भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात ‘पितृपक्ष’ म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद […]









