मेष
महिन्याच्या पूर्वार्धात थोडे संयमाने वागावे लागेल.आर्थिक पातळीवर सर्वांगीण विचार करूनच निर्णय घ्या.मित्रपरिवारावरील अतिविश्वास घातक ठरू शकेल उत्तरार्धात परिस्थितीत अनुकूल बदल जाणवतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.
वृषभ
आपल्या वागण्या-बोलण्याने कुणी नाहक दुखावला जात नाही ना, याची खबरदारी घ्या.अडचणीच्या प्रसंगी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा होईल. प्रवासात अधिक सतर्क राहा.क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना संधी उपलब्ध होतील.गुंतवणूक करणे पुढे ढकला.
मिथुन
कार्यक्षेत्रात सध्या तुमचे पारडे जड राहणार आहे.अर्थप्राप्तीचे योग चालून येतील.वरिष्ठांशी केलेली सल्लामसलत उपयुक्त ठरेल.महिन्याचा उत्तरार्ध थोडा जिकिरीचा असेल.कौटुंबिक कलहातून थोडा मनस्ताप संभवतो.
कर्क
विरोधकांना कमी लेखू नका.मोठ्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये.त्रयस्थांशी अति सलगी नको.नोकरी-व्यवसायात प्रगतीचा वेग चांगला असेल. वैयक्तिक प्रश्न आत्मविश्वासाने सोडवू शकाल.
सिंह
दुधाने तोंड पोळल्याने ताकही फुंकून पिण्याचे सध्याचे दिवस आहेत.कार्यक्षेत्रातील सहकारी,मित्रमंडळी यांना नाराज करू नका.जमा व खर्च यांचा ताळमेळ राखावा लागेल.कौटुंबिक मतभेद वेळीच मिटवा. गुंतवणूक करणे सध्यातरी टाळा.
कन्या
खर्चाचे नियोजन आवश्यक. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.महिन्याच्या पूर्वार्धात मानसिक ताण जाणवेल.वरिष्ठांकडून अपेक्षा वाढणार आहेत.वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.काहींना पित्ताचा त्रास जाणवेल.
तूळ
कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तृत्वाची इतरांवर छाप पडेल.योग्य निर्णय व कार्यतत्परतेमुळे कार्यसफलतेचे प्रमाण वाढेल.सरकार-दरबारच्या कामात यश येईल.हातून एखादे शुभकार्य घडेल.उत्तरार्धात थोडी प्रतिकूलता जाणवेल, सावध राहा.
वृश्चिक
व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीच्या काही चांगल्या संधी चालून येतील.नोकरदारांच्या कामाचे चीज होऊन पदोन्नती होईल.आर्थिक स्थैर्य लाभेल. भागीदारीतील तसेच कोर्टकचेरीतील प्रकरणे तडजोडीने मिटवा.
धनु
आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागावे लागणार आहे.वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करणे सध्यातरी थोडे कठीण दिसते.प्रवासात मौल्यवान चीजवस्तू सांभाळा. उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होईल. प्रयत्नांना यश येईल.
मकर
विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपाला न जुमानता आपली वाटचाल तशीच पुढे चालू ठेवा.रागावर नियंत्रण हवे. पैशाचे व्यवहार भावनेच्या आहारी जाऊन करू नका. आपली आर्थिक क्षमता विचारात घेऊनच दीर्घकालीन गुंतवणुकीसंबंधी निर्णय घ्या.
कुंभ
‘काही कमावण्यासाठी काही गमवावे लागते.’कामाचा वाढता व्याप, धावपळ यामुळे गृहकर्तव्याकडे थोडे दुर्लक्ष होईल.कौटुंबिक जीवनात नातेवाइकांना हस्तक्षेप करू देऊ नका.काहींना पोटाच्या विकारांपासून त्रास संभवतो.
मीन
ग्रहमान अनुकूल आहे.प्रगतीची घोडदौड सुरूच राहील.चालून आलेल्या संधीचा अचूक लाभ घ्या.समाजात तुमची पत वाढेल.उत्तरार्धात मतभेदास वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.जबाबदारीने वागा.