Horoscope Marathi - Kalnirnay Horoscope - October 2019
Wednesday, 25 May 2022 25-May-2022

Horoscope (Marathi)- October 2019

राशीभविष्य - ऑक्टोबर २०१९

मेष

या महिन्यात तुम्ही यशाचा आनंद घ्याल.प्रगतीचा आलेख उंचावणारा असेल.नोकरी-व्यवसायात तसेच समाजातही तुमच्या शब्दाला अधिक वजन प्राप्त होईल. मैत्रीतील व्यवहारात थोडी सावधानता बाळगा.


वृषभ

पैसा हा सर्वांनाच हवा असतो,पण तो मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब नको.नोकरदारांनी अधिक दक्षता बाळगावी.आप्तेष्टांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल असेल.


मिथुन

आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी अचूकतेवर भर द्या. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी येतील.नोकरी-व्यवसाय क्षेत्रात विचारपूर्वक केलेली कृती यश देणारी ठरेल.महिला वर्गाने बोलण्यावर जरा अंकुश ठेवावा.


कर्क

अपेक्षेप्रमाणे यश पदरी पडणार आहे.हाती असलेल्या पैशाचा योग्य विनियोग करा. काहींना वास्तुलाभ संभवतो.कुटुंबात सलोखा राखण्यासाठी थोडी तडजोड करावी लागेल.विरोधकांवर युक्तीने मात करा.


सिंह

कोणाला किती जवळ करावे व कोणापासून किती लांब राहावे,हे जाणून वागा. छोट्याशा कामासाठी देखील अधिक मेहनत घ्यावी लागेल.प्रयत्नात सातत्य ठेवा. उत्तरार्धात यश पदरी पडेल.ज्येष्ठ व्यक्तींनी औषधे-पथ्यपाणी याबाबत सतर्क राहावे.


कन्या

मौजमजेवरील खर्चाला कात्री लावावी लागेल.दूरदृष्टीने कामाचे नियोजन करा.मोठे आर्थिक व्यवहार पूर्ण करताना कायदेशीर बाबी विचारात घ्या. जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षाभंग संभवतो.अल्पपरिचितांना कोणताही शब्द, आश्वासन देऊ नका.


तूळ

कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारे मतभेद,वादविवाद यांना थारा न देता सर्वांना बरोबर घेऊन मार्गक्रमण करा.मनाविरुद्ध काही घडलेच तर त्याचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. काहींना पित्तविकारांपासून त्रास संभवतो. वेळीच इलाज योजा.


वृश्चिक

महिना प्रगतीपर आहे.कामे अपेक्षेप्रमाणे पार पडतील.आर्थिक घडामोडींवर मात्र बारीक लक्ष असू द्या.व्यावसायिकांनी अव्यवहार्य धाडस करू नये.दिलेला शब्द पाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा लागेल.कामानिमित्त प्रवास संभवतो.


धनु

या महिन्यात केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.नोकरी-व्यवसायात अनुकूलता प्राप्त होऊन प्रगतीचा वेग वाढेल.रखडलेले आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडतील.बेरोजगारांच्या प्रयत्नांना यश.


मकर

आर्थिक पातळीवरील निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील.विरोधकांच्या कारवाया वाढतील, त्यांचे मनसुबे उधळून लावा. उत्तरार्ध मात्र अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी आपलेच म्हणणे खरे,असा अट्टहास करू नये.


कुंभ

‘मुद्दामहून आपल्या मार्गात आडवे येणाऱ्यांना टाळून मार्गक्रमण करा. वादविवाद टाळा.कायदा हातात घेऊ नका.अतिरेकी विचार नुकसानकारक ठरू शकतो. उधारी-उसनवारीचे व्यवहार नको.महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे.


मीन

ग्रहमान तेवढे अनुकूल नाही,पण गुरुचे पाठबळ आपणास योग्य मार्ग दाखवेल.कर्तव्यपूर्तीसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.नोकरदारांनी आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओलांडू नये.