मेष
आपल्या मित्रपरिवारातील व्यक्तींची अचूक पारख करा.सर्वच आपले हितचिंतक नसतात. पूर्वार्धात महत्त्वाची कामे हाती घ्या.कार्यक्षेत्रातील आर्थिक उलाढालीस योग्य दिशा मिळेल.सकारात्मक विचार अवलंबा, अपेक्षापूर्ती होईल.
वृषभ
महिना उत्साहवर्धक आहे.तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.तुमच्या मताशी इतर सहमत होतीलच असे नाही.त्याला महत्त्व देऊ नका.कौटुंबिक पातळीवर काही अनपेक्षित चांगल्या घटना घडतील.उत्तरार्धात अपचनाचे त्रास संभवतात.
मिथुन
‘आर्थिक व्यवहारात चोख राहा.’ पैशाचे व्यवहार वेगळे व मैत्री वेगळी, त्यात गल्लत करू नका. उत्तरार्धात कामकाजात यश मिळेल.वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने प्रगतीचा मार्ग सुकर होईल.
कर्क
एखाद्या विषयावर मत व्यक्त करण्यापूर्वी त्यावर सर्वांगीण विचार करा.आर्थिक व्यवहारात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.कार्यक्षेत्रात लहानसहान अडचणींचा सामना करावा लागेल.उद्योग-व्यावसायिकांनी आपल्या क्षमतेनुसारच आर्थिक दीर्घकालीन गुंतवणूक करावी.
सिंह
केलेल्या सत्कर्माचे चांगलेच फळ मिळते, याचा सुखानुभव तुम्ही घेणार आहात.आर्थिक स्थैर्य वाढेल. प्रलंबित योजना कार्यान्वित होतील.उत्तरार्धात प्रवासात काळजी घ्या.जमीन-जुमल्याची कामे शक्यतो पुढे ढकलणे हितावह ठरेल.
कन्या
आपल्यावर असलेली जबाबदारी योग्यरीत्या कशी पार पाडता येईल यावर लक्ष केंद्रित करा.सहवासातील व्यक्ती आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा तर घेत नाही ना, ते पाहा. व्यावसायिकांना आपल्या क्षेत्रातील स्पर्धात्मक परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
तूळ
‘हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका’ असा सल्ला तुम्हा राशीच्या लोकांना आहे.आर्थिक आवक समाधानकारक असल्याने मन उत्साहित होईल.कलाकारांचा नावलौकिक होईल.खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक.
वृश्चिक
या महिन्यात जबाबदारी पार पाडताना काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील.अनावश्यक खर्च आटोक्यात ठेवा.नोकरी-व्यवसायातील छुप्या विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका.भागीदारी व्यवसायातील निर्णय सर्वानुमते घेऊन गैरसमजाला वाव देऊ नका.
धनु
कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांवर जास्त विसंबून राहू नका.स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारा.आर्थिक नियोजन अचूक हवे.लहानशी चूकही महागात पडू शकते.प्रतिष्ठित लोकांची मर्जी संपादन कराल.कलागुणांना चांगला वाव मिळेल.घरात शुभकार्ये घडतील.
मकर
आर्थिक आवक वाढेल.थोरामोठ्यांचा सहवास लाभल्याने मन उत्साहित होईल.सरकारदरबारी रखडलेली कामे मार्गस्थ होतील.वैवाहिक जीवनात सुसंवाद टिकवणे अगत्याचे ठरेल.कामानिमित्त छोटे-मोठे प्रवासयोग संभवतात.
कुंभ
ज्येष्ठांच्या अनुभवी,योग्य मार्गदर्शनाने कार्यक्षेत्रातील विकासाच्या कक्षा रुंदावतील.उत्तरार्धात आर्थिक आवक चांगली असेल.तसेच खर्चही वाढतील.कौटुंबिक जीवनात वाहणारे सौख्याचे वारे सुखदायक,आनंदी असतील.
मीन
विरोधकांबाबत ‘एक घाव दोन तुकडे’ अशी टोकाची भूमिका घेऊ नका.सबुरीने निर्णय घ्या.आर्थिक पातळीवर चढ-उतार जाणवतील. सध्यातरी कठोर परिश्रमाला पर्याय नाही.व्यवसाय क्षेत्रात मतभेदाची शक्यता असल्याने तडजोडीचे धोरण व्यवहार्य ठरेल.