Horoscope (Marathi)- November 2018

राशीभविष्य - नोव्हेंबर २०१८

मेष

हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. तुमच्या कामकाजाच्या वेळापत्रकात काही बदल करावे लागतील. आर्थिक व्यवहारात अनावश्यक धाडस टाळा. घरच्या वातावरणात अधिक गोडवा कसा येईल, ते पाहा.


वृषभ

थोडे चाकोरीबाहेर जाऊन अधिक काम केले तर मार्ग सुकर होईल. तुमच्याकडून काहींच्या अपेक्षा उंचावलेल्या असल्याचे जाणवले तर वेळीच नकार द्या. कौटुंबिक पातळीवर आनंददायी वातावरण असेल.


मिथुन

‘आप्तेष्टांत बोलताना मधुरता बाळगा’ असा ह्या महिन्याचा तुम्हाला सल्ला आहे. उत्तरार्धात कार्यसिद्धीचा अनुभव मिळेल. समाजात मानसन्मानाचे प्रसंग संभवतात. मित्रपरिवारात स्पर्धा, चढाओढ नको.


कर्क

नकारात्मक विचारांना थाराच दिला नाहीत तर प्रगती साधणे कठीण होणार नाही. घरामधील वादाचे प्रसंग युक्तीने हाताळा. आपले शब्द योग्य ठिकाणी अचूकपणे वापरल्यास गैरसमज टाळू शकाल. प्रवासात साहित्याची काळजी घ्या.


सिंह

सांप्रत तुम्हाला मिळत असलेल्या यशप्राप्तीमुळे अधिक आक्रमक बनू नका. कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. जमीन-जुमल्याची कामे सध्या हाती घेणे योग्य ठरणार नाही.


कन्या

आपली उक्ती आणि कृती यांचा योग्य मेळ साधला तर निराशा पदरी पडणार नाही. सहवासात आलेला प्रत्येक माणूस हा विश्वासार्ह असेलच असे नाही. आर्थिक व्यवहार करताना अधिक दक्षता बाळगा.


तूळ

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याची तुलना करणे योग्य नाही, हे जाणून वागलात तर महिना सुखावह आहे. विरोधक दबा धरून बसलेले असतातच, आपण त्यांना संधी मिळू न देणे हे महत्त्वाचे असते. मन शांत ठेवा.


वृश्चिक

आयुष्यात चढ-उतार हे असायचेच. सध्या एक बाजू समाधानाची तर दुसरी थोडी कष्टप्रद अशी आहे. काही आप्तेष्टांच्या विरोधी हालचालींमुळे तुमची मनःस्थिती थोडी नाराजीची होणार. एकाग्रता वाढवा.


धनु

सगळे सुरळीत मनासारखे चाललेले असताना अचानकपणे उद्भवणाऱ्या एखाद्या समस्येला तोंड देण्याची तयारी ठेवा. पूर्वार्धात काही अनुकूल घटना घडतील. खर्चाचे अंदाज चुकण्याची शक्यता जाणवते. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक.


मकर

आर्थिक पातळी उंचावणारा असा हा महिना आहे. महत्त्वाची कामे ह्या महिन्यात हातावेगळी करून घ्या. घर-जमिनीच्या कामास वेग येईल. मित्रपरिवारात आनंदून जाल. कौटुंबिक पातळीवर थोडे तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.


कुंभ

कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या कामात दुसऱ्यांवर विसंबून राहू नका. आपले समाजातील स्थान आणि संबंध यांचा योग्य उपयोग करून घेण्यास काळ अनुकूल आहे. अवाजवी पैसा खर्च होईल. पर्यायाची तयारी ठेवा.


मीन

नोकरी-व्यवसाय क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल, परंतु कौटुंबिक पातळीवर काही अप्रिय घटनांमुळे तुम्ही थोडे त्रासून जाल. शत्रूच्या शब्दाला अधिक महत्त्व दिलेत तर मनस्ताप तुम्हालाच होईल. काहींना पित्ताचा त्रास संभवतो.