Horoscope (Marathi)- May 2019

राशीभविष्य - मे २०१९

मेष

दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या मर्यादा लक्षात घ्या.आपल्या अपेक्षापूर्तीसाठी कठोर परिश्रमाला सकारात्मक विचारांची जोड द्यावी लागेल.कामकाजात अधिक दक्ष राहा.


वृषभ

 कार्यक्षेत्रातील व्यक्तींची अचूक पारख करणे आवश्यक आहे.आपल्या मार्गात अडथळे आणणाऱ्यांना त्याची योग्यती जाणीव करून द्या.कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण असेल. काहींना उष्णतेचे विकार उद्भवतील.


मिथुन

आपल्या सकारात्मक विचाराने कार्यउत्साह वाढेल.थोरामोठ्यांच्या योग्य मार्गदर्शनाने तुमची बाजू वरचढ ठरेल.आर्थिक व्यवहार करताना मात्र सतर्क राहा. सरकारदरबारच्या कामांना गती प्राप्त होईल.प्रवासावर खर्च होईल.


कर्क

महिना उत्साहवर्धक आहे.आर्थिक उलाढालींस योग्य दिशा मिळेल.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठित लोकांचा सहवास मन सुखावणारा ठरेल.कौटुंबिक मतभेद युक्तीने हाताळाल.पित्त-श्वास विकार संभवतात.


सिंह

विरोधकांवर बाजी उलटविण्यासाठी चातुर्याने डावपेच आखावे लागतील.नकारात्मक विचारांना अजिबात थारा देऊ नका.काही खोटी विधाने तुमच्या तोंडी टाकली जाण्याची शक्यता संभवते.परिस्थिती युक्तीने हाताळा.


कन्या

प्रसंगी एखादी लहानशी ठिणगीहीरौद्ररूप धारण करू शकते.कामकाजात सतर्क राहा.योग्य अभ्यास करूनच नवीन उपक्रमाचा अवलंब करा.व्यवसाय निमित्ताने प्रवास घडेल.दिलेला शब्द पाळला जाईल याची खबरदारी घ्या.


तूळ

सर्वांगीण विचार करूनच तुमच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या निर्णयाचा अवलंब करा.साधन उपलब्धता पडताळून,आपल्याला पेलतील तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा.मैत्रीतले मतभेद चव्हाट्यावर आणू नका.खाण्याची पथ्ये सांभाळा.


वृश्चिक

महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल आहे.मनाप्रमाणे कार्य-सिद्धी होईल.अथक प्रयत्नांना योग्य फळ मिळेल.उत्तरार्धात काही मतभेदाचे प्रसंग उद्भवले तर ‘एक घाव दोन तुकडे’ अशी भूमिका घेऊ नका.संयम बाळगा.पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्या.


धनु

कुटुंबासाठी काही तडजोडीची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल.विश्वासातील व्यक्तींकडून काही त्रास संभवतो.सावध राहा.प्रवासाच्या प्रस्तावावर विचारपूर्वक निर्णय घ्या.घाईगडबड नको.अपचनाचे विकार संभवतात.


मकर

तुमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळण्याचा सांप्रतचा काळ आहे.कार्यक्षेत्रातील अनपेक्षित समस्यांमुळे आलेले नैराश्य विरोधकांना जाणवणार नाही याची दक्षता घ्या. आपली पतप्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा.आर्थिक चढउतार जाणवतील.


कुंभ

ग्रहमान थोडे संमिश्र आहे.तुमच्या वागण्या-बोलण्याने शत्रूसंख्येत वाढ होत नाही ना,याची खबरदारी बाळगा.कौटुंबिक बाबींत नातेवाइकांचा हस्तक्षेप मनस्ताप वाढवेल.शांतचित्ताने यावर मार्ग शोधा.घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.


मीन

या महिन्यात काही अनपेक्षित घटनांमुळे मानसिक संतुलन टिकवून ठेवावे लागेल.नोकरी-धंद्यात अवाजवी धाडस करू नका.उत्तरार्धात काही मनाजोगत्या घटना घडतील.त्यामुळे थोडे सुखावून जाल.महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.