Horoscope (Marathi)- June 2018

राशीभविष्य - जून २०१८

मेष

ग्रहमान संमिश्र स्वरूपाचेआहे.प्रयत्नांना यश मिळेल.नुकत्याच सहवासात आलेल्याव्यक्तीवर विश्वास टाकू नका.संयमाने वागावे लागेल.डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.उत्तरार्ध आनंददायी असेल.


वृषभ

कौटुंबिक वादविवादात आपले मत विचारपूर्वकमांडा.सत्ताधारी आणि राजकारणी क्तींपासून काही गोष्टींत त्रास संभवतो.अपचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.गृहिणींना अनपेक्षितपणे प्रवासाचा योग.


मिथुन

आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टीयात तफावत असल्याचे जाणवेल.विचलित होऊ नका.थोडे संयमाने घेतलेत तर योग्य प्रकारे मार्गक्रमण करता येईल.प्रवासातून आनंद मिळेल.खर्च मात्र वाढतील.


कर्क

मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता पुढचा कार्यभाग साधा.समाजात आपल्या शब्दाला मिळणारा मान हा आपली प्रतिष्ठा वाढविणारा ठरेल.ज्येष्ठांच्या कृपाशीर्वादाने यशस्वी व्हाल.उत्तरार्धात प्रवास संभवतो.


सिंह

कर्तव्यपूर्तीचा आनंद ह्या महिन्यात तुम्ही उपभोगणार आहात.‘योग्य वेळी योग्य तिथे’ तुम्ही असल्याने संधी चालून येतील.कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.कौटुंबिक जीवन समाधानी असेल.धनवृद्धी होईल.


कन्या

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळून वागलात तर मार्ग सोपा होईल. उगाचच केल्या जाणाऱ्या खोट्यानाट्या आरोपांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. आपल्या निर्णयाशी ठाम राहा. ध्येयापासून विचलित होऊ नका.


तूळ

सांप्रत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ग्रहमान म्हणावे तेवढे अनुकूल नाही. आर्थक चणचण भासेल, मात्र कर्ज काढू नका. प्रकृतीच्या समस्याही जाणवतील.


वृश्चिक

आप्तस्वकीयांचा असलेला विरोध म्हणजे मनस्ताप! सध्या तुम्ही तशाच काहीशा परिस्थितीतून जाणार आहात. आर्थिक बाजू थोडी बळकट होईल. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा.


धनु

या महिन्यात छोटीशी गोष्ट मिळविण्यासाठी अधिक ताकद खर्च करावी लागणार आहे. मात्र यशप्राप्तीने सुखावून जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कार्यउत्साह वाढेल.


मकर

घरातील भांडणे घरातचठेवा.आहारावर नियंत्रण ठेवणेसध्या फार महत्त्वाचे आहे.प्रवासातकाही अनपेक्षित गोष्टींमुळे त्रास संभवतो.जमीन-जुमल्याची कामेपुढे ढकला. कर्ज काढू नका तसेच कुणाला जामीनही राहू नका.


कुंभ

ह्या महिन्यात काही मन सुखावून जाणाऱ्या घटना घडणार आहेत. जुनी येणी वसूल होतील. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहेत. आहार-विहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. मैत्रीत आर्थिक व्यवहार करु नका.


मीन

‘एक प्रिय तर एक अप्रिय’ अशा घटना ह्या महिन्यात घडतील. पावले जपून टाकावी लागतील. समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण ऐकून घेतल्याशिवाय आपली बाजू मांडूच नका. आर्थिक आवक चांगली असेल.