Horoscope (Marathi)- July 2019

राशीभविष्य - जुलै २०१९

मेष

अल्प यशाने भारावून जाऊ नका.स्थावर मालमत्तेचे व्यवहार सरकारी नियमांच्या चौकटीतच करा.चुकीचा मार्ग समस्या निर्माण करील.उत्तरार्धात घरातील काही अप्रिय घटनांमुळे थोडा मनस्ताप संभवतो.


वृषभ

आपली संगत आपल्याला मारक तर ठरत नाही ना,याची पूर्णपणे खबरदारी घ्या.उत्तरार्धात कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल.नोकरी-व्यवसाय क्षेत्रात अधिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.मित्रपरिवाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.


मिथुन

प्रासंगिक अडचणी उद्भवल्यामुळे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकावर थोडा परिणाम होण्याची शक्यता वाटते.कुठलाही शब्द वा आश्वासन विचारपूर्वक द्या.प्रवासात सतर्क राहा.डोळ्यांच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.


कर्क

कार्यतत्परता आणि मनोवस्था यांच्यातील द्वंद्वामुळे थोडा संभ्रम निर्माण होईल.परंतु सध्यातरी कर्तव्यदक्ष राहणेच फायद्याचे आहे.आप्तेष्टांबरोबर काही मतभेद संभवतात.महिलांना कार्यसफलतेचा आनंद उपभोगता येईल.


सिंह

जिद्द, मेहनत आणि कल्पकता यांच्या योग्य समन्वयाने प्रगतीचा आलेख उंचावेल.कामे मनासारखी पार पडतील.उद्योग-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. उत्तरार्धात अधिक सतर्क राहा.खर्चावर नियंत्रण आवश्यक.


कन्या

ग्रहमान बऱ्यापैकी अनुकूल आहे.स्वतःवरच्या कर्तृत्वावर असलेला विश्वास तुम्हाला यशाची उंची गाठून देईल.सामाजिक प्रतिष्ठा मिळेल.धनप्राप्तीचे नवे मार्ग सापडतील.कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.वाहनसुख संभवते.


तूळ

शांत चित्ताने आणि संयमपूर्वक परिस्थिती हाताळलीत तर होणारे गैरसमज टाळू शकाल.सामोपचाराने प्रश्न मार्गी लावा.महत्त्वाची कामे महिन्याच्या उत्तरार्धात करावी.कामानिमित्त प्रवास संभवतो.गुंतवणुकीच्या प्रलोभनात अडकू नका.


वृश्चिक

सद्य परिस्थिती तेवढी अनुकूल नाही.व्यावसायिक गुपिते,आडाखे,महत्त्वाची कागदपत्रे विरोधकांच्या हाती लागणार नाहीत याची दक्षता बाळगा.कौटुंबिक जीवनात गैरसमज पसरविणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे लागेल.


धनु

‘मतभेदाचे प्रसंग युक्तीने हाताळा.’कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढेल.घरातील सदस्याच्या आजारपणामुळे थोडी धावपळ होईल.उधारी-उसनवारी टाळा.सरकारी नियमांचे उल्लंघन नको.


मकर

महिन्याची सुरुवात आनंददायी घटनेने होईल.हाती घेतलेली कामे,स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरीत्या पार पाडू शकाल.उत्तरार्धात कौटुंबिक मतभेद होणार नाहीत,याची खबरदारी घ्या.पोटाचे विकार संभवतात.


कुंभ

जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या अपेक्षाभंगाचे दुःख अधिक त्रासदायक असते.सांप्रत तुम्हाला हा अनुभव घेऊनच मार्गक्रमण करावे लागेल.उत्तरार्धात परिस्थितीत बदल होईल.महिलांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.


मीन

कर्तव्यपालनात कसूर करू नका.केवळ स्वप्नरंजनात मश्गुल न होता प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य द्या.नोकरी-व्यवसायात केलेले नवे बदल यशस्वी होतील.प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.मित्रपरिवारात आर्थिक व्यवहार टाळावेत हेच बरे !