Horoscope (Marathi)- July 2018

राशीभविष्य - जुलै २०१८

मेष

एका बाजूला प्रगतीचा मार्ग दिसत असताना दुसऱ्या बाजूला काही छोट्या-मोठ्या विवंचना समोर उभ्या ठाकतील. दृढनिश्चयी व्हा. लवकरच या परिस्थितीत अनुकूल बदल दिसून येईल. घराचे प्रश्न लांबणीवर टाका.


वृषभ

प्रत्येक गोष्टीत तुलनात्मक विचार करणे योग्य ठरणार नाही. पूर्वार्धात नवीनच ओळख झालेल्या व्यक्तींकडून कटू अनुभव येण्याची शक्यता संभवते. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. आर्थिक प्राप्ती चांगली असेल.


मिथुन

आपली आर्थिक क्षमता भविष्यकालीन व्यावसायिक प्रकल्प, अंदाज याबाबत वाच्यता करु नका. गोपनीयता महत्त्वाची. सध्याचा काळ नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनुकूल नाही. कायद्याची चौकट पाळा .


कर्क

‘पेराल तसे उगवेल’ हे ध्यानी ठेवूनच वागा. आर्थिक नियोजन विचारपूर्वक करा. मौजमजेवर संयम ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक प्रश्न चातुर्याने सोडवावे लागतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. 


सिंह

तुमच्या कार्यकर्तृत्वाला व जिद्दीला ह्या महिन्याच्या पूर्वार्धात वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण उत्साहवर्धक असेल. वरिष्ठांची कृपादृष्टी लाभेल. विरोधकांना सहज नमवू शकाल.


कन्या

ग्रहमान तसे अनुकूल आहे. काहींना प्रवासातून लाभ संभवतो. सरकारदरबारी अडलेली कामे महिन्याच्या पूर्वार्धात मार्गी लावण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक पातळीही उंचावेल.


तूळ

ह्या महिन्यात काही अनपेक्षित खर्च वाढल्याने आर्थिक ताळमेळ जुळणार नाही. विरोधकांत वाढ होणार नाही हे पाहा. सकारात्मक विचार हे  कार्यउत्साह वाढवतात. सतत तुलनाच करत राहिलात तर निराशाच पदरी पडेल.


वृश्चिक

कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व पणाला लावून निर्माण केलेली आपली ओळख हेच आपले खरे सामर्थ्य आहे. वरिष्ठांच्या सहकार्याने नव्या योजना अमलात आणू शकाल. कौटुंबिक पातळीवर खर्चात वाढ संभवते.


धनु

व्यवसाय क्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. मतभेदास थारा न देता मार्गक्रमण करा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक सौख्यासाठी तडजोडीचे धोरण अवलंबा.


मकर

या महिन्यात आर्थिक आवक आणि जावक यांची गणिते जुळवताना थोडी कसरत करावी लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्यानेच महत्त्वाचे निर्णय अमलात आणा. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.


कुंभ

काळ थोडा कसोटीचा आहे. आर्थिक व्यवहार करताना आर्थिक क्षमताही ध्यानी घ्या. पेलतील तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा. मित्रपरिवारात अतिविश्वास दाखवू नये. योग्य कारणासाठीच खर्च करा.


मीन

महिन्याच्या पूर्वार्धात अपेक्षित यश पदरी पडेल, मात्र उत्तरार्धात सतर्कता आवश्यक आहे. मित्रपरिवारात खाजगी बाबींची चर्चा टाळा. आर्थिक व्यवहारात दुसऱ्या कुणावरही विसंबून राहू नका. अधिकाराचा गैरवापर नको.