Horoscope (Marathi)- January 2019

मेष

 नववर्षाभिनंदन! कामातील एकाग्रता, जिद्द आणि कठोर परिश्रमाने यश पदरी पडणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. नोकरी-व्यवसायात अल्पपरिचित व्यक्तीवर अधिक विश्वासून महत्त्वाची जबाबदारी सोपवू नका.


वृषभ

वर्षाच्या प्रारंभी ग्रहमानाची उत्तम साथ लाभत आहे. महिन्याचा पूर्वार्ध हा अधिक यशदायी असेल. धनलाभ चांगला संभवतो. उत्तरार्धात काही अप्रिय घटनांना सामोरे जावे लागण्याची शक्यता जाणवते.


मिथुन

महिन्याच्या सुरुवातीस काही व्यक्तींबरोबर झालेल्या मतभेदांमुळे तुम्ही थोडे विचलित व्हाल, परंतु त्यास अधिक महत्त्व देऊ नका. उत्तरार्धात सर्व आघाड्यांवर बाजी मारता येईल. कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील.


कर्क

नवीन वर्षाची सुरुवात आनंदी वातावरणात होणार आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रकृतीबाबतच्या छोट्या-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. उत्तरार्धात कुटुंबातील झालेल्या वादाने थोडा मानसिक त्रास संभवतो.


सिंह

‘मित्रमैत्रिणींवर अधिक विसंबून राहू नका,’ असे वर्षाच्या प्रारंभीच ग्रहमानाचे सांगणे आहे. तुमच्या कर्तृत्वास वाव मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात महत्त्वाचा निर्णय घेताना एकाच सल्ल्यावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.


कन्या

नववर्षाच्या सुरुवातीस एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेमुळे नाराजी संभवते. आपल्या वागण्या-बोलण्याने शत्रूसंख्येत वाढ होणार नाही याची काळजी घ्या. घर खरेदी-विक्रीबाबतचे निर्णय अधिक दक्षतेने घ्यावे लागतील.


तूळ

नववर्षाच्या सुरुवातीस काही धनप्राप्तीच्या वार्ता कानी पडतील. वाढत्या आर्थिकस्रोताने भारावून न जाता आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडा. महिन्याच्या उत्तरार्धात मित्रमैत्रिणींसोबतच्या आहारा-विहारावर नियंत्रण आवश्यक.


वृश्चिक

 ‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ हे लक्षात असू द्या. महिन्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक चांगला व यशदायी असेल. मार्गातील अडथळे कमी होतील. गुंतवणूक करण्यास अनुकूल काळ आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष नको.


धनु

नवीन वर्षाच्या प्रारंभी तुम्ही अधिक सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या चहाडखोरीमुळे मनस्ताप संभवतो. त्वरित टोकाची भूमिका घेऊ नका. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.


मकर

नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. मिळालेल्या यशाने आपल्या वागण्या-बोलण्यात काही बदल होत नाही, याची काळजी घ्या. उत्तरार्धात अधिक यश प्राप्त होईल. काहींना पित्तविकारांपासून त्रास संभवतो.


कुंभ

नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. मिळालेल्या यशाने आपल्या वागण्या-बोलण्यात काही बदल होत नाही, याची काळजी घ्या. उत्तरार्धात अधिक यश प्राप्त होईल. काहींना पित्तविकारांपासून त्रास संभवतो.


मीन

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात समाजातील प्रतिष्ठित, मान्यवर व्यक्तींचा सहवास संभवतो. नव्या संधी समोर चालून येतील. चातुर्याने आलेल्या संधीचा लाभ घ्या. आर्थिक व्यवहारात मिळालेल्या यशाने आत्मविश्वास वाढेल.