Horoscope (Marathi)- January 2018

राशीभविष्य - जानेवारी २०१८

Aries

नववर्षाभिनंदन! वर्षाची सुरुवात आशादायक आहे.पहिल्या पंधरवड्यात थोडी काळजी घ्यावी लागेल, असे वाटते.जिभेवर ताबा ठेवलात तर संभाव्य नुकसान टाळू शकाल. उत्तरार्धात ओळखीचा फायदा होईल.

 


वृषभ

ऐकीव गोष्टींवर आपण किती विश्वासून वागायचे, हे ठरविण्याचा काळ आहे.कौटुंबिक हितसंबंध जपताना विरोधकांत वाढ होणार नाही,ह्याची काळजी घ्या.टीकात्मक बोलणे टाळा.


मिथुन

कौटुंबिक पातळीवर एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना मतभेद होऊ न देणे, सध्या महत्त्वाचे आहे.बोलण्यावर ताबा ठेवा.खर्च आटोक्यात ठेवावा लागेल.उत्तरार्ध अधिक चांगला आहे.


कर्क

वर्षाच्या सुरुवातीस व्यक्तिगत पातळीवर एखादी आनंददायी बातमी कानी पडेल.आपला मोठेपणा सांगताना कोणी दुखावला जाणार नाही ह्याची काळजी घ्या.उत्तरार्धात मनावर ताबा ठेवून संयमाने वागावे लागेल.


सिंह

नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपणास आर्थिक विवंचना नसतील, हे नक्की. परंतु काही आप्तेष्टांच्या वागण्या-बोलण्याने तुम्ही थोडे त्रस्त व्हाल.ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.कार्यक्षेत्रात सर्वांशी सलोख्याने वागावे लागेल.


कन्या

वर्षाच्या पहिल्याच महिन्यात नोकरी-व्यवसायात आपणास एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील.अधिक मेहनत करावी लागेल.मैत्रीत अति विश्वास नको. आर्थिक आवक चांगली असेल.


तूळ

वर्षाच्या सुरुवातीस आपणाला थोडे संमिश्र ग्रहमान लाभत आहे.आपल्या जबाबदाऱ्या जाणून त्या योग्य प्रकारे निभावल्यास सरशी तुमचीच होईल.महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल आहे.उत्तरार्धात संयमाने वागावे लागेल.


वृश्चिक

‘आपल्या आवाक्याचे भान ठेवूनच वागा,’ असे वर्षाच्या सुरुवातीस ग्रहमानाचे तुम्हाला सांगणे आहे.नाहक चिडचिड नुकसान करू शकते. मनाला पटत नाही तेटाळण्याचा प्रयत्न करा.गोड बोलून मार्गक्रमण करावे लागेल.


धनु

ग्रहमान तसे अनुकूलआहे.कार्यास गती मिळेल.आर्थिक सफलता आणि प्रगतीकडे होणारी वाटचाल यामुळे यशाचा आलेख उंचावणार आहे.पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका.


मकर

छोट्याशा प्रतिकूलतेने आपला तोल जाणार नाही,याची काळजी वर्षाच्या सुरुवातीस घेणे आवश्यक आहे.सध्याचे ग्रहमान तुमची थोडी परीक्षाच घेत आहे.उत्तरार्धात खाण्यापिण्यावर संयम ठेवा.


कुंभ

वर्षाच्या प्रारंभीच एक आनंददायी बाब कानी पडेल.परंतु त्याने हरखून न जाता एकाग्रता वाढवून अधिक कार्यदक्ष राहिलात तर बाजी माराल.नाहक खर्च नेमका कोणता, हे जाणून खर्चाचे योग्य नियोजन करा.


मीन

वर्षाच्या पहिल्याच महिन्यात समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.या नवीन ओळखींचा फायदा करून घ्या.घरातील वाद घरातच मिटवा. मानापमानास अधिक महत्त्व देऊ नका.