Horoscope (Marathi) – December 2019

राशीभविष्य - डिसेंबर २०१९

मेष

या महिन्याचे ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. महत्त्वाची कामे करताना दिरंगाई टाळा. कार्यक्षेत्रातील वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. आप्तस्वकीयांमध्ये तुमच्याविषयी काही गैरसमज होणार नाहीत यासाठी दक्ष राहा. गुंतवणुकीच्या प्रलोभनांना बळी पडू नका.


वृषभ

आपले ध्येय साध्य करत असताना कुणाबरोबर तरी कटुता ही यायचीच. त्याचा अधिक विचार न करता आगेकूच करा.आर्थिकदृष्ट्या सध्याचा काळ समाधानकारक असेल. महिलांना कौटुंबिक जबाबदारी योग्य रीत्या पार पाडावी लागेल.


मिथुन

रविची अनुकूलता आणि गुरुचे मार्गदर्शन, यामुळे कठीण प्रसंगावर मात करणे पूर्वार्धात सहज शक्य होईल.उत्तरार्धात मात्र अति आत्मविश्वास हानीकारक ठरू शकतो याचे भान ठेवा.मित्रपरिवारापासून सध्या थोडे दूरच राहा.


कर्क

सतर्कता, संयम आणि सहनशीलता या गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणार आहात.उत्तरार्धात तुमच्या शब्दाला अधिक वजन प्राप्त होऊन कामे मार्गी लागतील.प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.


सिंह

महत्त्वाच्या कार्यपूर्तीसाठी प्रयत्नांचा वेग व कार्यतत्परता वाढवावी लागेल.एखादी अप्रिय घटना वगळता हा महिना चांगला आहे.जमा आणि खर्च यांच्यातील समतोलासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील.मेजवानीचे प्रसंग टाळावेत हेच बरे.


कन्या

पूर्वार्धात धनप्राप्तीचे योग संभवतात. बोलण्यावर नियंत्रण आवश्यक. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.जुन्या मित्रांच्या भेटीमुळे पूर्वस्मृतींना उजाळा मिळेल. कौटुंबिक पातळीवर अपेक्षित पाठिंबा मिळणे थोडे कठीण वाटते.


तूळ

सहजासहजी यश मिळणार नाही.डोके शांत ठेवून काम करण्याचा काळ आहे.अल्प फायद्याकरिता उगीच आपली प्रतिष्ठा पणाला लावू नका.नोकरी-व्यवसायात वादविवाद टाळा.उत्तरार्धात तुमचीच बाजू वरचढ ठरेल.


वृश्चिक

 चुगलखोर, नाहक गैरसमज पसरविणारे यांच्यापासून अधिक सावध राहा.व्यावसायिक निर्णयांबाबत गुप्तता पाळा.स्वबळावर निर्णय घ्यावे लागतील.घाईगडबडीने मतप्रदर्शन करू नका.प्रवासात वाहन चालविताना योग्य ती दक्षता घ्या.


धनु

कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे आधी ठरवून त्यानुसार निर्णय घ्या.आकस्मिक खर्चामुळे आर्थिक ताळेबंद सांभाळणे थोडे जिकिरीचे होईल. सरकारदरबारी कामे होतील.उत्तरार्धात धनप्राप्ती संभवते. महिलांनी मानापमानाच्या प्रसंगांना अधिक महत्त्व देऊ नये.


मकर

‘नवा विटी नवा डाव’ अशी काहीशी परिस्थिती असेल. नव्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अधिकारात वाढ होईल. घरातील शुभकार्यामुळे मन प्रसन्न राहील. हाती पैसा खेळेल.


कुंभ

या महिन्यात थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाने रेंगाळलेली कामे मार्गी लागून कार्यपूर्तीचा आनंद उपभोगू शकाल. मित्रपरिवाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. आपल्या बुद्धिचातुर्याने विरोधकांवर मात कराल.


मीन

वादविवादापेक्षा सुसंवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रातील भविष्यकालीन योजना, संकल्पना, आराखडे याबाबत गुप्तता पाळा. उत्तरार्धात अनुकूलता वाढून इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल होईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.